Join us  

म्हणून बच्चन कुटुंबीय आहे ऐश्वर्यावर मेहरबान, तिची कमाई पाहून भल्या भल्यांची होते बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 4:00 PM

जवळपास ८० ते ९० कोटी इतकी कमाई वर्षभरात ऐश्वर्या करते. एका जाहीरातीसाछी ती ५ ते ६ कोटी इतके मानधन घेते. तर सिनेमासाठी ८ ते १० कोटींहून अधिक मानधन ती घेते.

सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. अशीच काहीशी बाब  ऐश्वर्याबद्दल समोर आली आहे. ऐश्वर्या रायच्या कमाईचा आकडा पाहून तर भल्या भल्यांना देखील भुरळ येईल.

साचेबद्ध काम करण्यात रस नसून वेगळे काहीतरी करण्याच्या प्रयत्नात ऐश्वर्या असते. सुरूवातीपासूनच  ऐश्वर्याला सिनेमासाठी तगडी रक्कम ऑफर करण्यात येते. १९९४ मध्यो मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर करणारी ऐश्वर्या अगदी लक्झरीस आयुष्य जगते. आरस्पानी सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी ऐश प्रसिद्ध आहे. ऐशच्या फॅशन आणि स्टाईलचा जलवा फक्त बॉलीवुड पार्ट्या, इव्हेंट्स आणि केवळ भारतात पाहायला मिळतो असं नाही. 

सातासमुद्रापार कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही ऐशने आपल्या हटके फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट्ने हॉलीवुडच्या मंडळींची आणि जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत. तिच्या कान्समध्ये परिधान केलेल्या प्रिन्सेस गाऊन, हटके लिपस्टिकपासून ते एखाद्या सोहळ्यात परिधान केलेल्या आकर्षक डिझायनर ड्रेसपर्यंत प्रत्येकाचीच खास चर्चा होते.

म्हणूनच तर अनेक मोठ्या कंपनीच्या किंवा मग लॉरिअल सारख्या कॉस्मेटीकच्या जाहीरातींमध्ये ऐश्वर्याच झळकते. गेल्या सतत १२ वर्षापासून लॅक्मे, टायटन,लक्स,फिलिप्स आत्ताचा कल्याण ज्वेलर्स अशा अनेक ब्रँडच्या जाहिराती तिने केल्या आहेत.तिची लोकप्रियता इनकॉश करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. 

ऐश्वर्या कमाईच्या बाबतीत पती अभिषेकलादेखील मागे टाकले आहे.खुद्द अभिषेकनेच ही बाब एका मुलाखतीत सांगितली होती.  जवळपास ८० ते ९० कोटी इतकी कमाई वर्षभरात ऐश्वर्या करते. एका जाहीरातीसाछी ती ५ ते ६ कोटी इतके मानधन घेते.

तर सिनेमासाठी ८ ते १० कोटींहून अधिक मानधन ती घेते. फक्त देशातच नाहीतर परदेशातही ती अनेक जाहिराती , एव्हेंटस  अशा गोष्टी करेत.  अशाप्रकारे तिची २५८ कोटी इतकी नेट इनकम आहे. लग्नानंतरही ऐश्वर्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आपले काम करण्यात बिझी असते. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चनअमिताभ बच्चन