इव्हेंटमध्ये गॉर्जियस लूकमध्ये दिसली ऐश्वर्या राय-बच्चन, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:52 IST
नुकत्याच पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय-बच्चन टिपिकल इंडियन आउटफिटमध्ये बघावयास मिळाली. नुकतीच ती पुण्यात झालेल्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या इव्हेटमध्ये तिला Woman of Substance या टायटलने सन्मानित करण्यात आले.
इव्हेंटमध्ये गॉर्जियस लूकमध्ये दिसली ऐश्वर्या राय-बच्चन, पाहा फोटो!
नुकत्याच पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय-बच्चन टिपिकल इंडियन आउटफिटमध्ये बघावयास मिळाली. नुकतीच ती पुण्यात झालेल्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या इव्हेटमध्ये तिला Woman of Substance या टायटलने सन्मानित करण्यात आले. यावेळी ऐश्वर्या पिंक अॅण्ड गोल्डन रंगाच्या लहंग्यात खूपच सुंदर दिसत होती. तिने या हेवी ड्रेसवर हलक्या स्वरूपाची ज्वेलरी कॅरी केली होती. ऐश्वर्या लवकरच आगामी ‘फैनी खान’ या चित्रपटात अभिनेता अनिल कपूरसोबत बघावयास मिळणार आहे. सुत्रानुसार, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट, परिणिती चोपडा आणि सलमान खाननंतर ऐश्वर्याही या चित्रपटात गुणगुणताना दिसणार आहे. हा चित्रपट आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. अनिल-ऐश्वर्या याअगोदर २००० मध्ये आलेल्या ‘हमारा दिल आपके पास है’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती.