Join us  

आयुष शर्माच्या 'लवरात्रि'चा ट्रेलर बघून 'ही' व्यक्ती झाली इमोशनल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 1:46 PM

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माचा पहिला सिनेमा 'लवरात्रि'चा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलर लाँचिंगला अर्पिता खान आणि आयुषचा मुलगा आहिलसुद्धा हजर होते.

ठळक मुद्दे गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला ‘लवरात्रि’ एक रोमॅन्टिक चित्रपट आहेसलमानचा मेव्हुणा आयुष या सिनेमातून डेब्यू करतोय

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माचा पहिला सिनेमा 'लवरात्रि'चा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलर लाँचिंगला अर्पिता खान आणि आयुषचा मुलगा आहिलसुद्धा हजर होते. यावेळी आयुषला प्रश्न विचारण्यात आला की अर्पिताला ट्रेलर कसा वाटला ? याचे उत्तर देताना आयुष म्हणाला की, अर्पिता खूप नर्वस आणि एक्साईडेट होती. तसेच ती इमोशनल सुद्धा होती. अर्पिता सुरुवातीपासून या प्रोजेक्टशी जोडली गेलेली आहे. ट्रेलर बघितल्यानंतर  ती म्हणाली, थँक गॉड, तू चांगलं काम केले आहेस. ट्रेलर पाहुन मी खूप खुश आहे.    

 

सलमान खान प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला करतोय.  गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला ‘लवरात्रि’ एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. ट्रेलरमधून कथेचा थोडाफार अंदाज येतो. कदाचित वरीना हुसेन गुजरातेत येते आणि येथे तिची भेट आयुषसोबत होते. मग दोघांची मैत्री आणि पुढे प्रेम. पण यासाठी दोघांनीही बऱ्याच  अग्नी दिव्यातून जावे लागते, अशी याची ढोबळ कथा असल्याचे भासते. आयुषयात गरबा टीचरची भूमिका साकारणार आहे.  या सिनेमातून वरीना हुसेन अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. 

अरबाज खान आणि सोहेल खान हे दोघंही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याशिवाय काही प्रसिद्ध टेलिव्हिजन चेहरेसुद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरच आता ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा हा ‘लवरात्री’ बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :सलमान खान