Join us

अजय देवगण, शाहरुख खान नंतर आता सलमान खान विकणार पान मसाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 17:48 IST

आता सलमान खान पान मसाल्याची जाहिरात करणार आहे.

ठळक मुद्देराजश्री इलायची या कंपनीसाठी सलमान लवकरच जाहिरात करणार असून त्यासाठी त्याला मोठी रक्कम देण्यात आली आहे.

अजय देवगणची जुबान केसरी ही जाहिरात तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची तोंडपाठ आहे. अनेकवेळा या जाहिरातीसाठी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. त्याच्यानंतर शाहरुख खान विमलची जाहिरात करताना दिसला आणि आता सलमान खान पान मसाल्याची जाहिरात करणार आहे.

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, राजश्री इलायची या कंपनीसाठी सलमान लवकरच जाहिरात करणार असून त्यासाठी त्याला मोठी रक्कम देण्यात आली आहे. सलमानने या जाहिरातीसाठी करार केला असून पुढील काहीच दिवसांत तो या जाहिरातीचे चित्रीकरण करणार आहे. सलमानने जाहिरात केल्यानंतर लोक या प्रॉडक्टकडे अधिकाधिक वळतील असा या कंपनीला विश्वास आहे. आतापर्यंत कोणत्याही सेलिब्रेटीने जाहिरातीसाठी घेतलेल्या रक्कपेक्षा अधिक रक्कम सलमानला या जाहिरातीसाठी देण्यात आली असल्याची चर्चा रंगली आहे. 

सलमान खानने आजवर अनेक शीतपेय, तेल यांच्या जाहिराती केल्या आहेत. पण पान मसाल्याची जाहिरात करण्याची सलमानची ही पहिलीच वेळ आहे. 

टॅग्स :सलमान खानशाहरुख खानअजय देवगण