Join us  

करीना-अनुष्का नंतर ही प्रसिद्ध अभिनेत्री देणार 'गुड न्युज', कुटुंबियांच्या फोर्समुळे करते बेबी प्लानिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 10:05 AM

मोनालिसा आणि विक्रांत दोघेही २०१७ मध्ये बिग बॉस मध्ये सहभागी झाले होते. या शोमुळेच हे दोघे प्रकाशझोतात आले होते. 

'बिग बॉस सीझन 10' ची स्पर्धक असलेली मोनालिसा लवकरच तिच्या चाहत्यांना गुड न्यूज देण्याच्या तयारीत आहे. मोनालिसाने खुलासा केला की ती आणि तिचा पती विक्रांत बेबी प्लॅनिंग करत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मोनालिसा म्हणाली , सतत कुटुंबियाकडूनही मला याच गोष्टीची विचारणा होत असते. पुढच्या वर्षापर्यंत गुड न्युज मिळो हीच इच्छा असून त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या कमिटमेंट्स मी पुर्ण करत आहे.

 

कुटुंबाकडून या गोष्टीसाठी माझ्यावर दबाव टाकला जातोय त्यांच्यासाठी आता शेवटी मला माझी जबाबदारी पार पाडावी लागणार असल्याचे तिने म्हटले आहे.मोनालिसा आणि विक्रांत दोघेही २०१७ मध्ये बिग बॉस मध्ये सहभागी झाले होते. या शोमुळेच हे दोघे प्रकाशझोतात आले होते. 

मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. २००८ मध्ये ‘भोेले शंकर’ या भोजपुरी सिनेमातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तिने आतापर्यंत १२५ पेक्षा अधिक भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले आहे.परंतु बिग बॉसच्या सीजन १० मुळे तिच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळाली.

 

मोनालिसाने शोच्या दरम्यान तिचा बॉयफ्रेन्ड विक्रांत सिंग राजपूतसोबत लग्न केले होते. अनेकांनी मोनालिसाच्या या लग्नाला पब्लिसिटी स्टंट ठरवले होते. पण मोनालिसा आणि विक्रांतचे हे लग्न केवळ ‘बिग बॉस’चा टीआरपी वाढवण्यासाठी नव्हते तर त्यांनी खरोखरीच रसिकांना साक्षी मानत लग्न केले होते. विक्रांतही भोजपुरी सिनेमांमध्ये काम करतो.

बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर मोनालिसाने तिच्या मानधनातही अचानक वाढ केली होती. मात्र यामुळे तिला ऑफर्स कमी मिळू लागल्या. सिनेमाच्या ऑफर्स मिळण्यात अडचणी येत आहेत.

 

एका भोजपुरी सिनेमासाठी ती पहिले 2.5 लाख ते 3 लाख रुपये घेत होती.वर्षातून 5-6 सिनेमा करणा-या मोनालिसाची गणना टॉप भोजपुरी अॅक्ट्रेसमध्ये होत होती. नंतर तिने आपली फीस 6 लाख रुपये केली. आणि तिचा हाच एक निर्णयामुळे तिच्या करिअलाही उतरती कळा लागली.

टॅग्स :मोनालिसा