Join us

सिद्धार्थ मल्होत्रा सोबत ब्रेकअपच्या अफवांनंतर कियारा अडवाणीने सांगितला लग्नाचा प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 4:11 PM

कियारा अडवाणी सध्या तिचा सिनेमा 'भूल भुलैया 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

कियारा अडवाणी सध्या तिचा सिनेमा 'भूल भुलैया 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. अभिनेत्री यापूर्वी तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत होती. प्रत्यक्षात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. मात्र, या बातमीनंतर दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. त्यामुळे दोघांमध्ये  नेमके काय चालले आहे, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान, कियाराच्या जुग जुग जिओ या आणखी एका चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाचे निर्माते करण जोहर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी एकत्र आले होते.  ट्रेलरनुसार वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांचा घटस्फोट घेणार आहेत.

कियाराला तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाबद्दल विचारले जाणे सहाजिकच होते. पत्रकार परिषदेत जेव्हा कियाराला तिच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, “मी लग्नाशिवाय देखील स्थिर स्थावर राहू शकते, बरोबर? मी स्थिरस्तावर आहे, काम करतो, कमावतो आणि आनंदी आहे.

कियारा आणि सिद्धार्थ 'शेरशाह' सिनेमात एकत्र दिसले होते. या सिनेमातील दोघांची केमिस्ट्री खूपच पसंत केली गेली होती. दोघांचाही हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. दोघांनी कधीही त्यांचं रिलेशनशिप कन्फर्म केलं नाही. आणि आता त्यांच्या ब्रेकअपबाबत सस्पेन्स कायम आहे. आता येत्या काही दिवसात हे स्पष्ट होईल अशी आशा फॅन्सना आहे.

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्रा