Join us  

अदिती राव हैदरीच्या 'नवाब' चित्रपटाचा पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 11:02 AM

अदिती राव हैदरी दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'नवाब' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्दे 'नवाब' चित्रपटात अदिती दिसणार पार्वती नामक तरूणीच्या भूमिकेत

अभिनेत्री अदिती राव हैदरीने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला 'पद्मावत' चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक झाले होते. या चित्रपटानंतर तिच्या आगामी चित्रपटाबद्दल सध्या सगळीकडे खूप चर्चा होत आहे. तिच्या आगामी सिनेमाचे नाव 'नवाब' असे असून या सिनेमाचे दिग्दर्शन मणिरत्नम करणार आहेत. या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हे पोस्टर सध्या खूप वायरल होत आहे. 

'नवाब' चित्रपट विविध भाषेत प्रदर्शित होणार आहे. तेलुगू भाषेतील चित्रपटाचे नाव पार्वती असे अाहे मात्र चित्रपटाच्या पोस्टरवर इंग्रजीत 'नवाब' असे लिहिले आहे. या चित्रपटाच्या तमीळ वर्जनचे नाव 'चेक्का चिवन्था वानम' असे असणार आहे. या चित्रपटातील पोस्टरवर अदिती एका वेगळ्याच अंदाजात दिसते आहे. या सिनेमात अदिती पार्वतीच्या भूमिकेत दिसणार आहे आणि तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेता अरविंद स्वामी दिसणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती मद्रास टॉकिज आणि लायका प्रोडक्शनने केली आहे. या चित्रपटात अदिती व अरविंद स्वामी यांच्या व्यतिरिक्त सिंबू, विजय सेथुपती, अरूण विजय, ज्योथिका प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सध्या अदिती खूप व्यस्त असून ती या चित्रपटाव्यतिरिक्त आणखीन एक तेलगू सिनेमा करते आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वरूण तेज दिसणार आहे. हा चित्रपट अंतराळावर आधारीत आहे. अदिती राव हैदरीचे चाहते तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

 

टॅग्स :आदिती राव हैदरी