Join us  

मॉडेल अदिती गोवित्रिकरच्या बहीणीचा पतीविरोधात मानसिक छळाचा आरोप, पोलिसांत तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 11:29 AM

दारूच्या नशेत सिद्धार्थने सकाळी ४ वाजता बाथरुममध्ये डांबून अमानुष मारहाण केल्याचा आरोपही आरजूने आपल्या तक्रारीत केला आहे.

आदिती गोवित्रीकरची बहिण आरजू गोवित्रीकरने पती सिद्धार्थ सबरवाल विरोधात वरळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. गेल्या काही वर्षापासून सिद्धार्थ हा तिचा छळ करत असल्याचे तिने म्हटले आहे. या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेजही तिने पुरावे म्हणून पोलिसांना दिले आहेत. सिद्धार्थ हा एक बिझनेसमन असून त्याने मार्च 2010 आरजूसह लग्न केले होते.  सिद्धार्थवर मानहानीचा दावा आरजूने केला आहे. दारूच्या नशेत सिद्धार्थने सकाळी ४ वाजता बाथरुममध्ये डांबून अमानुष मारहाण केल्याचा आरोपही आरजूने आपल्या तक्रारीत केला आहे. सिद्धार्थ आणि आरजू यांना 5 वर्षाचा एक मुलगाही आहे. आता मुलाची कस्टडी सिद्धार्थला हवी आहे. तसेच पती सिद्धार्थच्या जाचाला कंटाळून अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली आहे. यावेळी आरजूसह बहिण आदिती गोवित्रीकरही आणि मित्र आशिष चौधरीही वरळी पोलिस स्टेशनमध्ये हजर होते.