Join us  

'आदिपुरुष'मधली शूर्पणखा म्हणतेय, 'म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 3:59 PM

Adipurush : अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'आदिपुरुष' आज प्रदर्शित झाला आहे. रामायणाच्या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'आदिपुरुष' आज म्हणजेच १६ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. रामायणाच्या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात प्रभासने रामाची, क्रिती सनॉनने सीतेची, सनी सिंगने लक्ष्मण आणि देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर तेजस्विनी पंडितनेदेखील महत्त्वाची भूमिका चित्रपटात साकारल्याचे समोर आले आहे. तिने चित्रपटात शूर्पणखाची भूमिका निभावली आहे. दरम्यान आता तिने चित्रपटातील लूक शेअर केला आहे. 

तेजस्विनी पंडित हिने आदिपुरुषमधील तिचा लूक शेअर करत म्हटले की, जे आयुष्यात कधी केलं नाही, ते चित्रपटात करून घेतलं... म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये. मला आदिपुरुषमध्ये पाहा "शूर्पणखा"च्या भूमिकेत. 

रामायणातील पौराणिक कथेवर आधारित प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रचंड वादानंतर अखेर आज प्रदर्शित झाला आहे. प्रभास आणि क्रितीच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगाऊ बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच भरपूर कलेक्शन केले आहे.

चाहत्यांकडून मिळताहेत अशा प्रतिक्रिया...नुकत्याच रिलीज झालेल्या आदिपुरुष संदर्भात युजर्सनी ट्विटरवर त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'आदिपुरुष हा एक दमदार चित्रपट आहे, उत्तम BGM सह पूर्ण आणि पूर्ण गूजबंप्स. दृश्ये… प्रभासचा अभिनय उत्कृष्ट आहे.. बाकी कलाकारांनीही छान काम केले आहे. गाणी मोठी आहेत… VFX काही खास नाही. एकूणच एक ब्लॉकबस्टर चित्रपट.’ दुसऱ्या युजर लिहिले की, ‘हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिमान आहे. प्रभासचा अभिनय जबरदस्त आहे. चित्रपटाचे व्हिज्युअल्स जबरदस्त आहेत.

टॅग्स :आदिपुरूषतेजस्विनी पंडितप्रभासक्रिती सनॉनदेवदत्त नागे