Join us

या अभिनेत्रीची करण्यात येते देवासारखी पूजाअर्चा,तिचे एक दोन नाही तर चक्क तीन तीन आहेत मंदिरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 15:12 IST

कलाकार रसिकांचे मनोरंजन करतात. आपल्या अभिनयान तेे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवतात. रसिक आपल्या लाडक्या कलाकारावर जीव ओवाळून टाकायलाही ...

कलाकार रसिकांचे मनोरंजन करतात. आपल्या अभिनयान तेे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवतात. रसिक आपल्या लाडक्या कलाकारावर जीव ओवाळून टाकायलाही तयार असतात. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक झलक पाहायला मिळावी यासाठी रसिक तासनतास या कलाकारांच्या घराबाहेर उभे असतात. लाडक्या कलाकाराचे सिनेमा एकदा दोनदा नाही तर शेकडो वेळा थिएटरमध्ये पाहणारे रसिकही विरळच. भारतात अशा कलाकार वेड्या रसिकांची कमतरता नाही. दक्षिणेकडे तर रसिक कलाकारांची अगदी देवासारखी पूजा करतात हे तर सा-यांनाच माहिती. मात्र लाडक्या कलाकाराला मंदिरात ठेवून पूजा करण्याची किमयासुद्धा या दक्षिणेकडील रसिकांनी साधली आहे. त्यातही दक्षिणेत एखाद्या गुजराती अभिनेत्रीची मूर्ती मंदिरात बसवून तिची पूजा करणे हे निश्चितच थक्क करणारे आहे. मूळची सूरतची असलेली अभिनेत्री नमिता वांकावाला उर्फ भैरवी हिचे दक्षिणेत एक नाही तर तीन मंदिर आहेत. नमिताची पहिली मूर्ती तामिळनाडूच्या तिरुनेलवेल्ली इथल्या एका मंदिरात बसवण्यात आली आहे.दक्षिणेकडील राज्यात तिची ३ मंदिर आहेत. लठ्ठ असूनही नमिता दक्षिणेची सर्वात हॉट अभिनेत्री ठरली आहे.दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सर्वात मादक अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. ‘जगन मोहिनी’ आणि 'बिल्ला' हे तिचे गाजलेले सिनेमा आहेत.नमिताची उंची सहा फूट असून ती दक्षिणेचीच नाही तर बॉलिवूडमधील सर्वात उंच अभिनेत्रींपैकी एक आहे. नमिता कराटेमध्ये डबल ब्लॅक बेल्ट आहे. 1998 मध्ये तिने ‘मिस सुरत’चा किताब पटकावला आहे. 2001 मध्ये ती मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत रनरअप राहिली. त्यावर्षी अभिनेत्री सेलिना जेटली मिस इंडिया ठरली होती. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नमिता इतकी प्रसिद्ध आहे, की एका चाहत्याने चक्क तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला होता. नमिताचा डाय हार्ट फॅन असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. नमितासोबत त्याला काही वेळ घालवायचा होता. यानंतर नमिताच्या सांगण्यावरुन पोलिसांनी त्याची सुटका केली.एकीकडे बॉलिवूडमध्ये अभिनेत्री झीरो साइजसाठी क्रेजी असतात, तर दुसरीकडे लठ्ठ असूनदेखील नमिताची दक्षिणेकडील लोकप्रियता नक्कीच कौतुकास्पद अशीच म्हणावी लागेल.