आपबिती सांगत ‘या’ अभिनेत्रींनी पुकारला कास्टिंग काउचविरोधात एल्गार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 16:36 IST
तेलगू इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपड करीत असलेली अभिनेत्री श्री रेड्डीने भर रस्त्यात अर्धनग्न आंदोलन करून कास्टिंग काउचविरोधात आवाज ...
आपबिती सांगत ‘या’ अभिनेत्रींनी पुकारला कास्टिंग काउचविरोधात एल्गार!
तेलगू इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपड करीत असलेली अभिनेत्री श्री रेड्डीने भर रस्त्यात अर्धनग्न आंदोलन करून कास्टिंग काउचविरोधात आवाज बुलंद केला. श्रीच्या या अजब आंदोलनामुळे संपूर्ण सिनेजगत हादरले असून, पुन्हा एकदा कास्टिंग काउचचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही काळापासून हॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचविरोधात #Mee Too या नावाने अभियान चालविले जात आहे. त्याचा प्रभाव आता बॉलिवूडमध्येही दिसून येत आहे. वास्तविक कास्टिंग काउचचा सामना इंडस्ट्रीत करिअर करू इच्छिणाºया तरुणींनाच करावा लागतो असे नसून, दिग्गज अभिनेत्रींनाही याचा सामना करावा लागला आहे. त्यांनी आपल्यावर बितलेली आपबिती सांगताना याविरोधात एल्गार पुकारला आहे. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत... रिचा चढ्ढा‘फुकरे’ गर्ल रिचा चढ्ढाने काही दिवसांपूर्वीच खळबळजनक खुलासा करताना म्हटले होते की, ‘बॉलिवूडमध्ये आउटसाइडर्स अभिनेत्रींना विवाहित अभिनेते आणि क्रिकेटपटूंसोबत डेटवर जाण्यास सांगितले जाते. असे केल्यास संबंधित अभिनेत्रीला पुढे जाण्यास मदत मिळते.’ पुढे रिचाने म्हटले की, जेव्हा मी न्यूकमर होती, तेव्हा मलादेखील अशाप्रकारचा सल्ला देण्यात आला होता. कमीत कमी वेळात जास्त यश मिळविण्याचा हा शॉर्टकट असल्याचे मला त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र मी त्यास नकार दिला होता. यावेळी रिचाने त्या अभिनेत्याचे नाव सांगणे टाळले होते. स्वरा भास्करस्वराने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाबाबतचा खुलासा करून खळबळ उडवून दिली होती. स्वराने म्हटले होते की, आम्ही ५६ दिवसांसाठी एका दुर्गम भागात शूटिंग करीत होतो. तेव्हा मी इंडस्ट्रीत नवखी होती. या चित्रपटाचा दिग्दर्शक मला सातत्याने मॅसेज करून रात्रीच्या जेवणासाठी येण्यास तगादा लावत होता. तो संपूर्ण दिवस माझा पाठलाग करायचा अन् रात्रीच्या वेळेस फोन करून त्रास द्यायचा. एकदा मला एका सीनवर दिग्दर्शकासोबत चर्चा करण्यासाठी हॉटेलमधील एका रूममध्ये जाण्यास सांगितले. त्याठिकाणी गेल्यावर तो मद्यपान करीत असल्याचे मला दिसून आले. यावेळी त्याने माझ्याशी अंगलटपणा करण्याचा प्रयत्न केला. ते माझ्यासाठी खूपच भीतीदायक होते, असे स्वराने सांगितले. कंगना राणौतबॉलिवूडची क्वीन कंगनानेही लैंगिक शोषणाबाबतचा खुलासा करताना म्हटले होते की, स्ट्रगलच्या दिवसांमध्ये मला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला. कंगनाने म्हटले होते की, ‘मला असे वाटत होते की, मी कोण्यातरी तुरुंगात बंद आहे. ज्या व्यक्तीने माझे शोषण करण्याचा प्रयत्न केला, तो व्यक्ती इंडस्ट्रीशी संबंधित होता. मात्र कंगनाने त्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा करणे टाळले. राधिका आपटेराधिकानेही तिच्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाविषयीची आपबिती सांगितली आहे. तिने सांगितले की, एका भूमिकेसाठी मला निर्मात्यांसोबत रात्र घालविण्याची आॅफर देण्यात आली होती. मात्र मी त्यास नकार दिला. राधिकाने म्हटले, ‘एकदा मला एका बॉलिवूडपटासाठी कॉल आला. त्याने मला एका मीटिंगविषयी सांगितले. तसेच हेदेखील विचारले की, तू त्या व्यक्तीसोबत रात्र घालवू शकतेस काय? मी त्याला हसून नकार दिला.’ प्रियांका चोप्राबॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये आपला डंका वाजविणाºया देसी गर्ल प्रियांका चोप्राला एकदा नव्हे तर कित्येकदा अशा प्रसंगांचा सामना करावा लागला. त्यामुळेच तिला दहा मोठ्या चित्रपटांपासून दूर राहावे लागले. प्रियांकाची आई मधू चोपडानेच याबाबतचा खुलासा केला आहे.