Join us

'संजू' चित्रपटात मान्यता दत्तची भूमिका साकारणार ही अभिनेत्री, पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 15:32 IST

संजू चित्रपटाच्या रिलीजची वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने पाहत आहेत. मेकर्स एक-एक करुन पोस्टर लाँच करुन  चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची भूमिका ...

संजू चित्रपटाच्या रिलीजची वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने पाहत आहेत. मेकर्स एक-एक करुन पोस्टर लाँच करुन  चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची भूमिका स्पष्ट करायची आहे. आता या चित्रपटाचे आणखीन एक नवे पोस्टर लाँच करण्यात आले.या नव्या पोस्टरमध्ये संजय दत्तच्या पत्नीच्या भूमिकेत दीया मिर्झा दिसते आहे. संजूतील प्रत्येक पोस्टरच्या थीमवर बॅकग्राऊंडला रणबीर कपूरचा फोटो आहे. यात रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारतो आहे. यात रणबीरसह मनीषा कोईराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दीया मिर्झा आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेला ‘संजू’ हा चित्रपट अभिनेता संजय दत्त याच्या जीवनातील चढ-उतारांवर आधारित आहे. हा चित्रपट एका प्रसिद्ध परिवारातून असलेल्या अभिनेत्याच्या जीवनाची कथा आहे. संजय दत्तच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आल्याने तो नेहमीच वादाच्या भोवºयात सापडलेला आहे. आता तो त्याच्या आयुष्यात स्थिरावला असला तरी, त्याचा भुतकाळ आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हीच बाब या चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ALSO READ :  ‘संजू’चे पहिले गाणे ‘मैं बढिया, तू भी बढिया...’ रिलीज!!तील दिवस, नातेवाइकांचा अबोला, दहशतवादी असल्याची चर्चा हे सर्व काही या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. दरम्यान, प्रदर्शित करण्यात आलेला टीजर खूपच मनोरंजक पद्धतीने दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात संजूबाबाच्या आयुष्यातील अशा काही घटना दाखविल्या जातील, ज्या तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील. संजय दत्तच्या आयुष्यातील वेगवेगळ्या शेड्स दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या टीझरमध्ये रणबीर कपूरने साकारलेल्या संजय दत्तच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले आहे. स्वत: संजय दत्त रणबीरचा अभिनय पाहुन थक्क झाला होता.