Join us  

विवाहित असूनही एकमेकांच्या प्रेमात पडले अन् मग, इंटरेस्टिंग आहे अनुमप खेर आणि किरण खेर यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 11:45 AM

किरण व अनुपम यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशी आहे, पण लग्न करण्याचा निर्णय दोघांसाठी सोपा नव्हता. कारण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा दोघेही आधीच विवाहित होते.

अनुपम खेर आणि किरण खेर बॉलिवूडमधील एक आयडिल कपलपैकी एक आहेत. दोघेही चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित नावं आहेत. किरण खेर अभिनयासोबतच राजकारणातही सक्रिय आहेत. अनुपम खेर आणि किरण खेर लग्न करण्याचा निर्णय दोघांसाठी सोपा नव्हता. नुकतंच अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत किरण खेर यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीचा एक रंजक किस्सा शेअर केला आहे.

एएनआयशी बोलताना अनुपम खेर यांनी किरण खेरसोबतची त्यांची पहिली भेट आणि त्याची लव्ह स्टोरी सांगितली आहे. किरण व अनुपम यांची भेट चंदीगडमध्ये झाली होती. दोघेही चंदीगड थिएटर ग्रूपमध्ये काम करायचे. यादरम्यान दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. एका मुलाखतीत किरण यांनी सांगितले होते की, असे काहीही नव्हते जे अनुपमला माझ्याबद्दल ठाऊक नव्हते. त्याच्याबद्दलही मला सगळे काही माहित होते. पण तेव्हा आमच्यात केवळ मैत्री होती. त्यापलीकडे काहीही नव्हते.

१९८० मध्ये किरण चंदीगडवरून मुंबईला आल्या. येथे त्यांची ओळख बिझनेसमॅन गौतम बेरीसोबत झाली. पुढे दोघांनीही लग्न केले. लग्नानंतर वर्षभरातच किरण आई झाली. सिकंदर खेर हा किरण आणि गौतम यांचा मुलगा आहे. सिकंदर चार पाच वर्षांचा असतानाच या लग्नात आपण आनंदी नाही, हे किरण व गौतम दोघांनाही कळून चुकले होते.

तिकडे १९७९ मध्ये अनुपम यांनी कुटुंबाच्या आग्रहावरून मधुमालती नामक मुलीसोबत लग्न केले. पण ते दोघेही आपल्या नात्यात आनंदी नव्हते. याचदरम्यान नादिरा बब्बर यांच्या एका नाटकासाठी किरण व अनुपम दोघेही कोलकात्यात गेले. येथे त्यांची अनेक वर्षांनी पुन्हा भेट झाले. नाटक संपल्यावर अनुपम यांनी किरण यांना प्रपोज केले. आधी तर अनुपम विनोद करताहेत, असे किरण यांना वाटले. पण नंतर आपल्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे, हे त्यांना कळून चुकले. पुढे दोघेही एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्यातील प्रेम वाढत गेले. . यानंतर दोघांनीही आपआपल्या पार्टनरसोबत घटस्फोट घेऊन १९८५ मध्ये लग्न केले. अनुपम यांनी किरण यांचा मुलगा सिकंदर यांना स्वीकारत त्याला आपले नावही दिले. 

टॅग्स :अनुपम खेरकिरण खेर