Join us

अभिषेक ‘स्पीचलेस’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 20:20 IST

पत्नी ऐश्वर्या राय हिच्या   ‘ऐ दिल मुश्किल’ या आगामी चित्रपटाबद्दल बच्चन कुटुंब संभ्रमावस्थेत असेलही कदाचित. पण अमिताभ बच्चन ...

पत्नी ऐश्वर्या राय हिच्या   ‘ऐ दिल मुश्किल’ या आगामी चित्रपटाबद्दल बच्चन कुटुंब संभ्रमावस्थेत असेलही कदाचित. पण अमिताभ बच्चन यांचा लवकरच रिलीज होऊ घातलेल्या ‘पिंक’ कुणाच्याही मनात काहीही संशय नाहीय. वडिलांचा चित्रपट पाहिल्यानंतर खुद्द अभिषेक बच्चन स्तब्ध झाला आहे. पित्याचा अभिनय पाहून अभिषेक इतका प्रभावित झाला की, त्याच्याजवळ त्यांची प्रशंसा करायला शब्दच उरले नाहीत. स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान अभिषेकने ‘पिंक’ पाहिला आणि चित्रपट पाहिल्यानंतर एकापाठोपाठ एक असे टिष्ट्वट्स  केले. पहिल्या tweetमध्ये त्याने लिहिले ‘स्पीचलेस’. दुसºयाtweet मध्ये   ‘पिंक’एक दमदार चित्रपट असल्याचे तो म्हणाला. तसे अमिताभ यांच्या चित्रपटाची प्रशंसा करणे, अभिषेकसाठी नवे नाही. मात्र ऐश्वर्याच्या आगामी  चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर पित्याच्या चित्रपटाची इतक्या जाहिरपणे स्तूती करून जणू त्याने आपली आवडच बोलून दाखवली. येत्या १६ सप्टेंबरला ‘पिंक’ रिलीज होतो आहे. या महिलाप्रधान चित्रपटात अमिताभ यांनी वकिलाची भूमिका साकारली आहे.}}}}