Join us  

सुशांत सिंग रजपूतला मी अनेकवेळा मरताना पाहिले आहे म्हणत अभिषेक कपूरने लिहिली भावनिक पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:35 PM

सुशांतचे चाहते सोशल मीडियाद्वारे त्याच्या आठवणींना उजाळा देत असतात. आता दिग्दर्शक अभिषेक कपूरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सुशांतची एक खास आठवण सांगितली आहे. 

ठळक मुद्देअभिषेकने शेअर केलेल्या व्हिडिओत काय पो छे या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे शूट सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सुशांत आणि राजकुमारमध्ये मारामारीचा सीन सुरू असून यात अभिषेक सुशांतला बॉडी लँग्वेज कशाप्रकारची असावी हे समजून सांगत आहे. 

सुशांत सिंग रजपूतने 14 जूनला आत्महत्या करत सगळ्यांना शॉक दिला. केवळ बॉलिवूडमधील मंडळींनाच नव्हे तर त्याच्या फॅन्सना देखील या गोष्टीचा धक्का बसला. आजही त्याचे फॅन्स या दुःखातून सावरू शकलेले नाहीत. सुशांतचे चाहते सोशल मीडियाद्वारे त्याच्या आठवणींना उजाळा देत असतात. आता दिग्दर्शक अभिषेक कपूरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सुशांतची एक खास आठवण सांगितली आहे. 

सुशांत सिंग रजपूतला पवित्र रिश्ता या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला. त्याने काय पो छे या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूरने केले होते. अभिषेकने काय पो छे या चित्रपटाच्या मेकिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

अभिषेकने शेअर केलेल्या व्हिडिओत काय पो छे या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे शूट सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सुशांत आणि राजकुमारमध्ये मारामारीचा सीन सुरू असून यात अभिषेक सुशांतला बॉडी लँग्वेज कशाप्रकारची असावी हे समजून सांगत आहे. 

हा व्हिडिओ शेअर करताना अभिषेकने लिहिले आहे की, या चित्रपटाची कथा प्रचंड आवडल्याने या चित्रपटासाठी आम्ही काम करताना खूप उत्साही होतो. आम्ही क्लायमॅक्स लिहिला, त्यावेळी मी खूप रडलो होतो. या सीनचे चित्रीकरण करताना देखील मी रडलो होतो. या सीनचे एडिटिंग करताना देखील मी रडलो होतो. बँकराऊंडसहित हा सीन पाहाताना तर मी खूपच रडलो होतो. इशानला मी मरताना खूप वेळा पाहिले आहे. केदारनाथमध्ये देखील मी त्याचे निधन होताना पाहिले. त्यामुळे 14 जूनला त्याच्या निधनाची बातमी मला मिळाली, त्यावेळी मी सतब्ध झालो होतो आणि आजही आहे. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत