Join us

​अभिषेक बच्चनचे करिअर लागणार मार्गी; साईन केले चार सिनेमे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 13:25 IST

अभिषेक बच्चनच्या करिअरला ओहोटी लागलीय. होय, कारण गतवर्षी रिलीज झालेल्या ‘हाऊसफुल3’नंतर अभिषेक कुठेही दिसला नाही. त्या चित्रपटानंतर अभिषेक काही ...

अभिषेक बच्चनच्या करिअरला ओहोटी लागलीय. होय, कारण गतवर्षी रिलीज झालेल्या ‘हाऊसफुल3’नंतर अभिषेक कुठेही दिसला नाही. त्या चित्रपटानंतर अभिषेक काही दिवसांसाठी ब्रेकवर आहे, असे सांगितले गेले होते. कदाचित हा ब्रेक संपलाय आणि यासोबतच ज्युनिअर बच्चनच्या चाहत्यांची प्रतीक्षाही संपलीय. होय, यंदा अभिषेकने एक नाही, दोन नाही तर चार चार सिनेमे साईन केले आहेत. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. लवकरच या चार चित्रपटांवर अभिषेक काम करणे सुरु करणार आहे.पहिला चित्रपट अभिषेकच्या स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसखाली तयार होणार ‘लेफ्टी’ हा आहे. हा चित्रपट प्रभुदेवा दिग्दर्शित करतो आहे. दुसरा चित्रपट अभिषेकने साईन केलाय, त्याचे नाव अद्याप ठरलेले नाही. हा चित्रपट निशिकांत कामत दिग्दर्शित करत आहेत. तिसरा चित्रपट निर्माता रॉनी स्क्रूवाला प्रॉडक्शनचा असून चौथा चित्रपट आहे, ‘बच्चन सिंह.’ हा चित्रपट प्रियदर्शन दिग्दर्शित करणार आहेत. यावर्षाअखेरिस या चारही सिनेमांचे शूटींग सुरु होणार आहे.‘लेफ्टी’ हा चित्रपट एका सर्वसामान्य मुलाची कथा आहे. काळाच्या ओघात तो शहर वाचवणारा तरूण बनतो. ‘रेडी’चे पटकथाकार कोना व्यंकट या चित्रपटाची पटकथा लिहित आहेत. व्यंकट यांनी सांगितले की, अभिषेकने मला तीन वर्षांपूर्वी साईन केले होते. त्याच्या एका मित्राने माझी कथा ऐकली होती आणि अभिषेकला ऐकवली होती. यानंतर अभिषेकने या चित्रपटाच्या नरेशनसाठी मला बोलवले होते. त्याला पटकथा आवडली होती. हा चित्रपट एक सायन्स थ्रीलर आहे. जसा ‘गझनी’ होता.ALSO READ : जेव्हा ऐश्वर्यासाठी अभिषेक झाला डॉक्टर!या चार चित्रपटांसोबतच अभिषेक व ऐश्वर्या राय बच्चन हे रिअल लाईफ कपल ‘गुलाब जामुन’ नामक चित्रपटात एकत्र दिसणार असल्याचीही चर्चा आहे. एकंदर काय, तर हे वर्ष अभिषेकला भरभराटीचे सिद्ध होणार, असे वाटतेय.