Join us  

अभिषेक बच्चनचा केला खुलासा, 'द्रोणा' फ्लॉप झाल्यानंतर मला अनेक सिनेमातून काढून टाकले

By गीतांजली | Published: October 06, 2020 4:43 PM

अभिषेकने करिअरमध्ये अनेक चढ-उतार बघितले आहेत.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला फिल्म इंडस्ट्रीमध्ये 20 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. या दरम्यान अभिषेकने करिअरमध्ये अनेक चढ-उतार बघितले. गेल्या 20 वर्षात अभिषेकने रुपेरी पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कधी त्या यशस्वी झाल्या कधी नाही झाल्या. अभिषेक बच्चनने भारतात थिएटर पुन्हा सुरू झाल्याच्या बातमीबद्दल आनंद व्यक्त केला. त्याचवेळी सोशल मीडियावरील एका यूजरने  ट्रोल करत विचारले की - 'द्रोण'नंतर तुम्हाला चित्रपट कसे मिळाले?

यावर अभिषेकने उत्तर देताना लिहिले, 'हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर मला बर्‍याच चित्रपटांतून काढून टाकले गेले. कोणत्या सिनेमाचा भाग होणे त्याच्यासाठी कठीण होते. पण आपण सर्वजण आशेवर जगतो आणि आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो.  रोज सकाळी आपल्याला उठवाच लागले आणि सूर्याच्या प्रकाशात आपली लढाई लढावी लागले. आयुष्यात कोणतीच गोष्ट सोपी नाही आहे. जोपर्यंत जीवन आहे तोवर संघर्ष आहे.'अभिषेकने आपल्या उत्तरांने अनेकांची मनं जिंकली आहेत. 

अभिषेक बच्चनने 2008 मध्ये गोल्डी बहलच्या 'द्रोणा' सिनेमात सुपरहीरोची भूमिका साकारली होती. या सिनेमात प्रियंका चोप्रा, केक मेनन आणि जया बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या. मात्र बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला. आजतकच्या रिपोर्टनुसार हा सिनेमा तयार करण्यासाठी 60 कोटींचा खर्च करण्यात आला होता मात्र प्रेक्षकांनी हा सिनेमा नाकारला होता. 

टॅग्स :अभिषेक बच्चन