Join us  

रक्षाबंधनच्या निमित्ताने अभिषेक बच्चनने पोस्ट केला लहानपणीचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2017 9:03 AM

रक्षाबंधनच्या निमित्ताने अभिषेक बच्चनने त्याचा आणि श्वेता बच्चन नंदाचा एक लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला खूप लाइक्स मिळत आहेत.

अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता बच्चन नंदा ही आपल्याला खूपच कमी वेळा एकत्र पाहायला मिळतात. पण या दोघांमध्ये खूपच चांगले बाँडिंग आहे आणि हे बाँडिंग रक्षाबंधनच्या निमित्ताने दिसून आले आहे.अभिषेक बच्चनने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आपल्याला छोटासा अभिषेक आणि श्वेता पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे या फोटोत अभिषेकच्या डोक्यावर एकही केस नाहीये. त्यामुळे अभिषेकच्या चाहत्यांना हा फोटो चांगलाच आवडत आहे. या फोटोला हजाराहून अधिका लाइक मिळाले असून अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अभिषेकने हा फोटो पोस्ट करताना त्यासोबत एक छानशी पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमधून त्याने त्याची मोठी बहीण श्वेतावर असलेले त्याचे प्रेम व्यक्त केले आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी आजही वयाने आणि साइजने तितकाच लहान आहे असे तिला नक्कीच वाटत असणार... पण मला खात्री आहे की, तिला जेव्हाही गरज असणार तेव्हा मी तिच्यासोबत असणार आणि ती माझ्यासोबत असणार... श्वेता दी हॅपी राखी.अभिषेकने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये श्वेता आणि अभिषेक खूपच गोड दिसत आहे. एवढेच नव्हे तर नेटकरी त्यांच्या कपड्यांचे देखील चांगलेच कौतुक करत आहेत. श्वेता ही अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मोठी मुलगी असून ती नेहमीच बॉलिवूडच्या जगमगत्या दुनियेपासून दूर राहिली आहे तर अभिषेकने त्याच्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूडमध्येच करियर केले आहे.  Also Read : पाहाच स्वप्निल जोशीची लेक मायराचे हे क्यूट फोटो