Join us  

आमिर खानच्या 'गजनी'चा येणार सीक्वल? १५ वर्षांनंतर परतणार संजय सिंघानिया; अल्लू अर्जुनसोबत आहे हे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 2:52 PM

Ghajini Movie : आमिर खानचा 'गजनी' चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. त्यात आमिरशिवाय असिन आणि जिया खानही होत्या. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन ए आर मुरुगदास यांनी केले होते. आता आमिर या सुपरहिट सिनेमाचा सिक्वेल बनवण्याचा विचार करत आहे.

१५ वर्षांपूर्वी 'गजनी' (Ghajani Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला, ते हेलावून गेले. संजय सिंघानिया आणि कल्पना यांची प्रेमकहाणी आजपर्यंत कोणीही विसरले नाही. आमिर खान (Aamir Khan) आणि असीन(Asin)ने दमदार अभिनयाने या पात्रांमध्ये प्राण फुंकले होते. आता इतक्या वर्षांनी संजय पुन्हा एकदा पडद्यावर पुनरागमन करत आहे. होय. आमिर खान 'गजनी' म्हणजेच 'गजनी २'चा सीक्वल बनवणार आहे. यासाठी तो दक्षिणेकडे वळला आहे आणि 'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांच्याशी बोलले आहे. 

'लाल सिंग चढ्ढा' फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने चित्रपटातून ब्रेक घेतला. मात्र, गेल्या वर्षी त्याने आरएस प्रसन्ना यांच्या 'चॅम्पियन्स' चित्रपटाची निर्मिती करत असल्याची घोषणा केली होती. आता नवीन बातम्या येत आहेत की तो २००८ मध्ये रिलीज झालेल्या 'गजनी' या अॅक्शन-थ्रिलर सिनेमाचा सिक्वेल बनवणार आहे. असा दावा केला जात आहे की आमिर यासाठी सतत हैदराबादला जात आहे आणि या प्रकल्पाबाबत निर्माता अल्लू अरविंद यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

आमिर खान अल्लू अरविंद यांना अनेकदा भेटलागेल्या आठवड्यात आमिर खान अल्लू अरविंद यांना भेटला होता, असे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. दोघांनी अनेक प्रोजेक्ट्सच्या कल्पनेवर चर्चा केली होती. दोघेही एकत्र काम करण्यास उत्सुक आहेत. तथापि, हे फक्त एक संभाषण आहे. अद्याप कशाचीही पुष्टी झालेली नाही. असे असले तरी, दोघांनाही संजय सिंघानियाची कथा पुढे नेण्याची इच्छा असून काही महिन्यांत स्क्रिप्ट फायनल करणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सर्व काही गुप्त ठेवण्यात आले आहे.

आमिर खानला येताहेत अनेक ऑफर्स आमिरला फिल्म इंडस्ट्रीकडून डझनभर ऑफर्स येत असल्याचंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एका सशक्त आशयाच्या नाटकासाठी तो स्नेहा रजनीसोबत चर्चेत आहे. त्याला प्रशांत नीलच्या पॅन इंडिया चित्रपटाची ऑफरही ज्युनियर एनटीआरसोबत देण्यात आली आहे, परंतु हे सर्व प्रकल्पांवर सध्या चर्चा सुरु आहे.

टॅग्स :आमिर खानअसिन