Join us  

आमिर खानची लेक इराने आई-वडिलांसोबत किरण रावला सांगितले होते डिप्रेशनबद्दल, मिळाला होता हा सल्ला

By तेजल गावडे | Published: November 14, 2020 1:08 PM

आमिर खानची मुलगी इराने जेव्हा तिच्या डिप्रेशनबद्दल पालकांना सांगितले तेव्हा त्यांनी काय सल्ला दिला होता, याचा खुलासा केला आहे.

आमिर खानची मुलगी इरा खान बऱ्याच काळापासून डिप्रेशनचा सामना करत होती, असे वृत्त समोर आले होते. याबद्दल इराने बऱ्याचदा मोकळेपणाने सांगितले आहे. आता इरा खानने या मुद्द्यावर व्हिडीओ सीरिज सुरू केली आहे. इराने डिप्रेशन आणि मेंटल हेल्थच्या व्हिडीओचे सीरिज बनवल्या आहेत. या क्रममध्ये तिने नुकताच सीरिजमधील पहिला व्हिडीओ शेअर केला आहे.

यात इराने डिप्रेशन, मेंटल हेल्थ आणि आपबीतीबद्दल लोकांना सांगितले. व्हिडीओ शेअर करत इराने लिहिले की, जो व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे, त्याच्याशी काय बोलले पाहिजे? कोणत्या नैराश्यातील व्यक्तीला तुम्ही काय सांगितले पाहीजे आणि काय नाही बोलले पाहिजे?

व्हिडीओत इराने बरेच काही सांगितले आहे. या बातचीत दरम्यान इरा म्हणाली की, प्रत्येक जण डिप्रेशनला आपल्या आपल्या पद्धतीने समजवतात.त्यामुळे एका व्यक्तीवर तोच सल्ला काम करतो आणि दुसऱ्यावर नाही. काही लोक तुम्हाला बिझी राहण्यासाठी सांगतात आणि काही बिझी न राहण्यासाठी सांगतात. 

स्वतःबद्दल सांगताना इरा म्हणाली की, काही लोकांनी तिला पॉझिटिव्ह राहण्याचा सल्ला दिला होता. प्रत्येक जण म्हणतो की स्वतःला व्यस्त ठेव, लवकर उठ आणि सकारात्मक विचार कर. डिप्रेशनमुळे इरा चार डॉक्टर्सकडे गेली होती. 

इराने आपल्या डिप्रेशनबद्दल आई वडील आमीर खान आणि रीना दत्ता यांना सांगितले होते. याशिवाय तिने आमिर खानची पत्नी किरण रावलादेखील याबद्दल सांगितले होते. इराने खुलासा केला की किरण आंटीने मला सांगितले होते की, व्यस्त राहू नको. सातत्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उड्या मारू नको. थोडी संथ हो.

टॅग्स :आमिर खानइरा खान