Join us  

किरण राव सांगतेय, आमिर खानसोबत राहाणे आहे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 2:56 PM

आमिरसोबत राहाणे कठीण असल्याचे किरणने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सांगितले होते.

ठळक मुद्देकिरण रावने करणला कॉफी विथ करण या कार्यक्रमात सांगितले होते की, आमिर आणि माझी ओळख झाली, त्यावेळी त्याचे रिनासोबतचे वाद सुरू होते. तसेच आमिरचा स्वभाव हा खूप वेगळा असल्याचे त्याच्यासोबत फिट होणे मला कठीण वाटत होते.

आमिर खानने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधी रिना दत्ताशी लग्न केले होते. पण काहीच वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमिरने किरण रावशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाली असून बॉलिवूडमधील क्यूट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. आमिरसोबत राहाणे कठीण असल्याचे किरणने काही दिवसांपूर्वी कॉफी विथ किरण या कार्यक्रमात सांगितले होते. पण तिने असे का सांगितले, त्यामागे एक खास कारण आहे.

किरण रावने करणला कॉफी विथ करण या कार्यक्रमात सांगितले होते की, आमिर आणि माझी ओळख झाली, त्यावेळी त्याचे रिनासोबतचे वाद सुरू होते. तसेच आमिरचा स्वभाव हा खूप वेगळा असल्याचे त्याच्यासोबत फिट होणे मला कठीण वाटत होते. त्याला पार्ट्या करायला अजिबातच आवडत नाहीत. त्याला गाणी मोठ्या आवाजात ऐकलेली आवडत नाहीत. या सगळ्यामुळे तो एकदम शांत असेल असे अनेकांना वाटते. पण असे काहीही नाहीये. 

एका मुलाखतीत आमिर खानने किरण आणि त्याच्या भेटीविषयी सांगितले होते.  त्याने सांगितले होते की, मी जेव्हा 'लगान' सिनेमा करत होतो तेव्हा किरणसोबत भेट झाली होती. ती असिस्टंट डायरेक्टरपैकी एक होती. पण त्यावेळी आमच्यात काहीच नातं नव्हतं. आमची मैत्रीपण झाली नव्हती. ती यूनिटचा एक भाग होती.

माझ्या घटस्फोटानंतर काही काळाने मी तिला पुन्हा भेटलो. ट्रॉमाच्या त्या फेजमध्ये तिचा फोन आला होता आणि मी तिच्यासोबत अर्धा तास बोललो. जेव्हा मी फोन ठेवला तेव्हा मी म्हणालो, 'My God! जेव्हा मी तिच्यासोबत बोलतो तेव्हा मला फार आनंद होतो'. त्यानंतर आम्ही डेटिंग सुरू केलं. लग्नाआधी आम्ही दीड वर्षे सोबत होतो. 

२००५ मध्ये आमिर खान आणि किरण रावने लग्न केलं. त्यांना एक मुलगाही आहे. त्याचे नाव आझाद आहे. प्रोफेशनल लाइफबाबत सांगायचं तर किरण सिने निर्माती, स्क्रिनरायटर आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्हसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. धोबी घाट या सिनेमाचं तिने दिग्दर्शनही केलं आहे.

टॅग्स :आमिर खानकिरण राव