Join us  

आमिर खानने वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी चाहत्यांना दिला धक्का, चाहत्यांची झालीय निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 5:29 PM

आमिर खानने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. त्याने या निर्णयावर पुनर्विचार करावा असे त्याच्या चाहत्यांना वाटत आहे.

ठळक मुद्देआमिर खानने कालच त्याचा वाढदिवस साजरा केला. आता त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये सांगितले आहे की, ही त्याची शेवटची पोस्ट असून तो सोशल मीडियाला रामराम ठोकत आहे.

आमिर खानसोशल मीडियावर सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याचे चाहते त्याला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात. पण आता त्याच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. आमिरने सोशल मीडियाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरने त्याची शेवटची पोस्ट शेअर करत ही बातमी त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.

आमिर खानने कालच त्याचा वाढदिवस साजरा केला. आता त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये सांगितले आहे की, ही त्याची शेवटची पोस्ट असून तो सोशल मीडियाला रामराम ठोकत आहे. त्याला त्याचे संपूर्ण लक्ष कामाकडे केंद्रित करायचे असल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. आमिरच्या आगामी चित्रपटांविषयी, तसेच त्याच्याविषयी अपडेट्स त्याच्या चाहत्यांना आमिर खान प्रोडक्शनच्या सोशल मीडिया हँडलवर पाहायला मिळतील. 

आमिरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझ्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमासाठी मी आभारी आहे. मला तुम्हाला एक बातमी सांगायची आहे की, ही माझी सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट असणार आहे. तसाही मी सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय असतो आणि आता मी सोशल मीडिया पूर्णपणे सोडण्याचे ठरवले आहे. आमिर खान प्रोडक्शनच्या सोशल मीडिया हँडलवर माझ्याविषयी तुम्हाला जाणून घेता येईल. आपण पूर्वी ज्याप्रकारे संवाद साधत होतो, त्याप्रमाणे पुढे देखील मी तुमच्या संपर्कात असणार आहे. 

टॅग्स :आमिर खानसोशल मीडिया