Join us  

आमिर खानची लेक ‘या’ दिवशी विवाहबंधनात अडकणार, ईराच्या लग्नाचं बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रण नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:29 PM

आमिरची लेक ईरा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसह लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ईरा लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सध्या मनोरंजन विश्वात लगीनघाई सुरू आहे. नुकतंच दाक्षिणात्य अभिनेता अशोक सेल्वनने लग्नगाठ बांधली. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आप खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर या महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आता बॉलिवूडमधील आणखी एका कपलच्या विवाहाची चर्चा रंगली आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरची लेक ईरा खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ईरा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसह लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ईरा लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ईरा आणि नुपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्याच वर्षी त्यांचा साखरपुडा पार पडला होता. आता ते विवाहबंधनात अडकणार आहेत. ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ईरा आणि नुपूर ३ ऑक्टोबरला कोर्ट मॅरेज करणार आहेत. त्यानंतर ते वेडिंग रिसेप्शन देणार आहेत. राजस्थानमधील उदयपूरमध्ये त्यांच्या लग्नाचा सोहळा असणार आहे.

"अजित पवार की देवेंद्र फडणवीस? प्रभावी उपमुख्यमंत्री कोण?" सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

कोर्ट मॅरेज केल्यानंतर तीन दिवस त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम असणार आहेत. ईरा आणि नुपूर कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधतील. आमिर खानच्या लेकीच्या लग्नात बॉलिवूडमधील सेलिब्रिटी उपस्थित नसणार आहेत. ईराच्या लग्नासाठी आमिर उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे.

Video: ...अन् रेखा यांनी पापाराझीच्या गालावर मारली चापट; पुढे काय घडलं पाहा

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ईरा आणि नुपूरने साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले होते. लेकीच्या साखरपुड्यात आमिरने खास डान्सही केला होता. आमिरचा होणारा जावई नुपूर हा एक फिटनेस ट्रेनर आहे. तो ईराचाही ट्रेनर होता. फिटनेस ट्रेनिंगच्या दरम्यानच त्यांचे सूर जुळले. त्यानंतर त्यांनी काही वर्ष डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :इरा खानआमिर खानसेलिब्रिटी