Join us  

पिठाच्या पिशवीत 15 हजार ठेवणारा आमिर नाही मग कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 10:54 AM

आमिरने खरे गरिब आणि गरवंत कसे शोधले याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

अभिनेता आमिर खानने २ किलो गव्हाच्या पीठातून १५ हजार रुपयांची मदत गरिबांना केल्याचं सांगण्यात येत आहे. यांसदर्भात टिकटॉकवर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे ही माहिती देण्यात येत होती. आमिर खानने, एका ट्रकमध्ये गव्हाच्या पिठाचे २ किलोच्या पिशव्या ठेवल्या होत्या. ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांच्या घरी जेवण बनत नाही, अशा गरजूंनी येऊन हे पीठ घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या पिशवीतील पीठात ५०० रुपयांच्या नोटाही होत्या. आमिरने खरे गरिब आणि गरवंत कसे शोधले याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अखेर यावर अखेर आमिर खानने ट्वीट केले आहे. आमिर म्हणाला, ''मी गव्हाच्या पीठात पैसे टाकलेले नाही, ही गोष्ट अफवा आहे. या व्हिडीओतील व्यक्तिला रॉबिन हूडला स्वत:ची ओळख करुन द्यायची नाही.''

आमिर खानने आत्तापर्यंत दान केलेल्या वस्तू किंवा रकमेची कधीही प्रसिद्धी केली नाही. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही त्याबाबत आमिरने कधीच काही सांगितले नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून व्हायरल झालेला हा व्हिडीओ अखेर फेक असल्याचे समोर आले आहे. आमीर खान सध्या आपल्या कुटुंबासमवेत सेल्फ आयसोलेशनमध्ये घरातच आहेत. 

टॅग्स :आमिर खान