Join us  

शिल्पा शेट्टीला जाहीरपणे किस करणाऱ्या ६५ वर्षीय स्टारने ३५ वर्षीय गर्लफ्रेंडशी केले लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 4:01 PM

हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने एका जाहीर कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला व्यासपीठावरच किस केले होते. ज्यानंतर एकच वादंग निर्माण होते. ...

हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने एका जाहीर कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला व्यासपीठावरच किस केले होते. ज्यानंतर एकच वादंग निर्माण होते. वाद वाढत असल्याचे बघून गेरेने शिल्पाची माफीही मागितली होती. आता रिचर्ड गेरे त्याच्या लग्नावरून चर्चेत आला आहे. त्याचबरोबर रिचर्ड गेरे तब्बल ३० वर्षांनंतर टीव्ही जगतात कमबॅक करीत आहे. रिचर्ड ‘मदरफादरसन’ या शोमधून पुन्हा एकदा आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या शोमध्ये तो अमेरिकी मीडियातील व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. ज्यामध्ये ‘पीकी ब्लिंडर्स’ची कलाकार हेलम मॅकक्रोरी हीदेखील भाग घेणार आहे. दरम्यान, २००७ मध्ये १४ एप्रिल रोजी एड्स जनजागृती अभियानादरम्यान रिचर्ड गेरेने शिल्पा शेट्टीला सार्वजनिकपणे किस केले होते. त्यानंतर रिचर्ड गेरेला भारतात खूप विरोध केला गेला. वाढता विरोध बघून रिचर्डला शिल्पाची माफीही मागावी लागली. त्याचबरोबर त्याच्या विरोधात न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला होता. वास्तविक रिचर्डचे आयुष्य सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिले आहे. त्याच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान असलेल्या एका सुपरमॉडेल गर्लफ्रेंड सोबतच्या अफेअरमुळेही तो चांगलाच वादाच्या भोवºयात सापडला होते. त्याचबरोबर गर्लफ्रेंड पद्मालक्ष्मीबरोबरही त्याला २०१४ मध्ये एका रेस्टॉरेंटमध्ये बघण्यात आले होते. दरम्यान, रिचर्ड गेरे आता विवाहाच्या बंधनात अडकला आहे. त्याने गेल्या महिन्यातच आपल्या ३५ वर्षी गर्लफ्रेंड एलेजेंड्रा सिल्वाशी लग्न केले आहे. सिल्वाने एका मुलाखतीदरम्यान म्हटले की, मी खरोखरच एखाद्या फेयरीटेलसारखे स्वत:ला भासवत आहे. मनात कुठलाही भ्रम न ठेवता मी स्वत:ला या जगातील सर्वात लकी महिला समजत आहे. दरम्यान, रिचर्ड आणि सिल्वा २०१४ पासून एकमेकांना डेट करीत आहेत. दोघांची भेट रिचर्डच्या फॅमिली हॉटेलमध्ये झाली होती. रिचर्डने त्याच्या नव्या शोविषयी सांगितले की, टॉम रॉब स्मिथद्वारा लिखित शोमधून मी पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅक करीत आहे. ‘मदरफादरसन’ हा शो वडील मॅक्स (गेरे), त्याची पूर्व पत्नी (हेलन) आणि त्याचा मुलगा कॅडेन (हावल) यांच्या कथेवर आधारित आहे.