3852_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 02:41 IST
समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी ऊर्मी बºयाच जणांना असते. समाजकार्याला वाहून घेणारे भारतामध्ये खूप आहेत. त्यांनी लोकांसाठी आपला वेळ सत्कारणी लावण्यासाठी प्रयत्न केले. समाजाच्या विकासासाठी झटले. त्यांची कथा ही देशासाठी नक्कीच भूषणावह आहे. अशा समाजकार्य करणाºयांची माहिती या ठिकाणी देत आहोत...
3852_article
समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी ऊर्मी बºयाच जणांना असते. समाजकार्याला वाहून घेणारे भारतामध्ये खूप आहेत. त्यांनी लोकांसाठी आपला वेळ सत्कारणी लावण्यासाठी प्रयत्न केले. समाजाच्या विकासासाठी झटले. त्यांची कथा ही देशासाठी नक्कीच भूषणावह आहे. अशा समाजकार्य करणाºयांची माहिती या ठिकाणी देत आहोत...नेपाळी सीमेलगत असणाºया वेश्याव्यवसायातून सुमारे ८०० हजार मुलींना बाहेर काढण्याचे काम रंगू सौरिया यांनी केले. लहान मुलांना इंजेक्शन देऊन आणि दिवसाला २० वेळा बलात्कार या ठिकाणी होत होते. पूर्वोत्तर आणि पूर्व भागातील १८ वर्षांखालील सुमारे २० हजार मुलामुलींना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले. आयआयटीमध्ये शिकलेल्या वरुण श्रीवास्तव यांनी झोपडपट्टीमधील मुलांना शिक्षण देण्याचे तसेच ‘उपाय’ या त्यांच्या अशासकीय संस्थेतर्फे प्रवाहात आणण्याचे काम केले. इंदोर येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या आदित्य तिवारी यांनी दोन वर्षे सरकारशी झगडून दत्तक घेण्यासंदर्भातील नियम बदलण्यास भाग पाडले. शेवटी आदित्य यांचा विजय झाला आणि देवांग असलेल्या मुलाला दत्तक घेऊन अनिश तिवारी असे नाव दिले. आयआयएम पासआऊट रवी गुलाटी यांनी कॅनडामधील कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून भारतामध्ये समाजकार्य करण्यास सुरुवात केली. ट्यूशनमधून मिळालेला पैसा त्यांनी सामान्यांसाठी खर्च केला. भारताच्या मिसाईल वूमन म्हणून डॉ. टेसी थॉमस यांची ओळख आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यात अग्नी-४ मध्ये त्या प्रोजेक्ट डायरेक्टर होत्या. २००९ साली वयाच्या १६ व्या वर्षी बीबीसीने बाबर अलीला जगातील सर्वांत तरुण मुख्याध्यापक म्हणून गौरवान्वित केले. शोषित समाजातील मुलांसाठी त्यांनी स्वत: शाळा सुरू केली. वयाच्या नवव्या वर्षी शिकविण्यास प्रारंभ केला. त्यानंतर मोठ्या संख्येने त्याचा विस्तार केला. छोटी भाजीपाला विक्रेती असणाºया सुभाषिनी यांनी आपल्या गावात हॉस्पिटल सुरू करण्यासाठी सारी रक्कम खर्च केली. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली. आजारात असताना योग्य उपचार न मिळाल्याने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हॉस्पिटल उभारण्याची त्यांची मनीषा होती. अनाथांची आई म्हणून सिंधूतार्इंना ओळखले जाते. एक हजाराहून अधिक अनाथ मुलांचे त्यांनी संगोपन केले. पती आणि कुटुंबाने झिडकारल्यानंतर त्यांनी भीक मागण्यास सुरुवात केली. याच ठिकाणी त्यांनी अनेक अनाथ मुलांना दत्तक घेऊन आपल्या मुलांप्रमाणे त्यांना वाढविले.