Join us  

'3 इडियट्स'च्या चतुरची बायको 'लय भारी', बॉलिवुडच्या अभिनेत्रींनाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 12:47 PM

'३ इडियट्स'मध्ये चतुर रामलिंगम हे पात्र रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरले होते. 'दिल तो बच्चा है जी', 'प्लेयर्स', 'देसी बॉयज' यांसारख्या इतर सिनेमांमधे त्याने भुमिका साकारल्या आहेत.

'३ इडियट्स' सिनेमात आमिर खान, आर माधवन, करीना कपूर, शर्मन जोशी या कलाकारांचा दमदार अभिनय आणि सिनेमाची कथा यामुळे सिनेमा प्रचंड गाजला. सिनेमातील संवाद, प्रसंग, कथानकातील पात्रे, साऱ्याच गोष्टी आजही रसिकांच्या लक्षात आहे. जेव्हा जेव्हा सिनेमा टीव्हीवर लागतो तेव्हा तेव्हा हा सिनेमा पाहिला जातो. जगभरातल्या रसिकांची या सिनेमाने मनं जिंकली. अनेकांना या सिनेमाने प्रकाशझोतात आणले.

प्रसिद्ध कलाकारांना सोडून इतर कलाकारांनी पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा या सिनेमाने मिळवून दिली.या सिनेमातील एका पात्राने धमाल उडवून दिली होती ते पात्र होते चतुर रामलिंगम. ही भूमिका साकारली होती अभिनेता ओमी वैद्यने. त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला त्याने पूर्णपणे न्याय दिला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मिळालेल्या संधीच त्यानं सोनं केले.

 या सिनेमानंतर ओमीचीही लोकप्रियता प्रचंड वाढली. चतुर रामलिंगम हे पात्र रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरले होते. 'दिल तो बच्चा है जी', 'प्लेयर्स', 'देसी बॉयज' यांसारख्या इतर सिनेमांमधे त्याने भुमिका साकारल्या आहेत. सिनेमाच नाही तर ओमी वैद्य जाहिरातींमधूनही झळकत असतो. जाहीरातक्षेत्राचही तो फार लोकप्रियत बनला आहे. खरतरं ओमीच्या इतर एखाद्या पात्रापेक्षा चतुर रामलिंगमचं पात्र रसिकप्रेक्षकांच्या मनावर कायम अजरामर ठरलं आहे असं म्हणता येईल.त्याच्याविषयी जाणून घेण्याची त्याच्या चाहत्यांची इच्छा असते. 

ओमी वैद्य सोशल मीडियावरही सक्रीय असतो. कुटुंबास क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतानाचे अनेक फोटो तो चाहत्यांसह शेअर करत असतो. फोटोंंमुळेच ओमीची पत्नीचीही चर्चा रंगते.  जेव्हा केव्हा तिचे फोटो सोशल मीडियावर येतात तेव्हा ती अनेकांच्या चर्चेचा विषय ठरते. ओमीची पत्नी मिनलही फार देखणी आहे.

मिनल हाऊस वाईफ आहे. दोघेही सुखाने संसार करत आहेत. ओमीच्या यशामध्ये मिनलाचाही तितकाच वाटा आहे. खंबीरपणे मिनला ओमीला साथ देते. दोघांमध्ये फार सुंदर केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे ओमी कधी कधी त्याच्या पत्नीमुळेही चर्चेत असतो. सोशल मीडियावरही चतुर फार लोकप्रिय असल्याचे दिसते.

टॅग्स :ओमी वैद्य आमिर खान