हृतिक रोशनच्या 'सुपर ३०' साठी मुंबईत लागणार १० कोटींचा सेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 12:48 IST
हृतिक रोशनचा आगामी चित्रपट 'सुपर ३०'साठी मुंबईत तब्बल १० कोटींचा सेट तयार असल्याची बातमी समोर आली आहे. हृतिक रोशन ...
हृतिक रोशनच्या 'सुपर ३०' साठी मुंबईत लागणार १० कोटींचा सेट
हृतिक रोशनचा आगामी चित्रपट 'सुपर ३०'साठी मुंबईत तब्बल १० कोटींचा सेट तयार असल्याची बातमी समोर आली आहे. हृतिक रोशन सध्या आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट करत आहे त्याची खूप चर्चा बॉलिवूडमध्ये चालू आहे. नुकताच या चित्रपटासाठी हृतिकने केलेला लूक सोशल मीडिया मधून सर्वांच्यासमोर आला होता. डीएनएच्या रिपोर्टनुसार हृतिक चित्रपट 'सुपर३०'चे चित्रीकरण बिहारमध्ये करत आहे. पण बिहारमधील वाढत्या गर्मीमुळे चित्रपटाच्या टीमला तिथे शूटिंग पूर्ण करण्यात अडचण होत आहे म्हणून ह्या चित्रपटाच्या मेकर्सने चित्रपटाचे पुढील चित्रीकरण मुबंईच्या स्टुडियोमध्ये करणार असल्याचे निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते मुंबईतल्या स्टुडियोमध्ये सेट उभारणार आहेत. हा सेट जवळजवळ १० कोटींचा असेल अशी चर्चा आहे. हा सेट वातानुकूलित असेल त्यामुळे हृतिकला शूट करायला सोपे जाईल.ALSO READ : रस्त्यावर पापड विकताना दिसला बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार; ओळखणेही झाले मुश्किल!या चित्रपटामधून हृतिक पहिल्यांदा बायोपिकमध्ये काम करत आहे. या चित्रपटात तो गणिततज्ञ आनंद कुमार यांची भूमिका करत आहे. 'सुपर ३०' हा चित्रपट पाटणाच्या आनंद कुमार याच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी १९९२मध्ये गणित हा विषय शिकवायला सुरवात केली होती त्यावेळेस त्यांनी सुरवातीला महिना ५०० रुपये देऊन भाड्याच्या खोलीत शिकवायला सुरवात केली होती पण नंतरच्या २ वर्षातच त्याच्याकडे २ विद्यार्थ्यांपासून ३६ विद्यार्थी झाले आणि नंतर त्याच्याकडील विद्यार्थ्यांची संख्या ५०० वर गेली नंतर या गोष्टी रून प्रेरित होऊन त्यांनी 'सुपर३०' ची सुरवात केली. आनंद कुमार बिहारात सुपर ३०' नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. या चित्रपटातून हृतिक बरोबर टीव्ही अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. विकास बहल दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे.