- Satish Dongre -लोकशाहीप्रधान भारतात प्रत्येक सुजाण नागरिकाला मतदानाचा हक्क असून, तो प्रत्येकाने बजावायलाच हवा’ हे जरी वास्तव असले तरी काही बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्स मतदानाचा हक्क बजावण्यास सपशेल नकार देतात. यांच्याबाबतीतील विरोधाभास असा की, सिनेमांच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना मतदानाचा आग्रह धरणारी ही मंडळी मात्र स्वत: कधीही मतदान करीत नाहीत. याचा अर्थ त्यांना देशाप्रती आदर नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल; परंतु काही सरकारी कारणास्तव त्यांना मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहावे लागत आहे. पाहूयात कोण आहेत हे स्टार्स....अक्षयकुमारआपल्या देशाप्रती प्रचंड आदर आणि गर्व ठेवून असलेला खिलाडी स्टार अक्षयकुमार याच्याकडे भारतीय नागरिकत्व नसल्याने तो कधीही मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. काही वर्षांपूर्वी अक्षयकुमारने भारत सोडून कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले होते. आता यामागचे नेमके कारण काय, हे अक्षयच चांगल्या प्रकारे सांगू शकेल. असो, त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व नसल्या कारणाने त्याला मतदानाचा हक्क बजावता येत नाही. त्यामुळे तो या महत्त्वपूर्ण प्रक्रियेपासून नेहमीच दूर राहिला आहे. आलिया भट्टभट्ट परिवारातील सर्वांत लहान मुलगी आलियाचेही या लिस्टमध्ये नाव आहे. महेश भट्टची मुलगी असलेल्या आलियाकडे अद्यापपर्यंत भारतीय नागरिकत्व नाही. मात्र यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. कारण आलियाची आई एक ब्रिटिश नागरिक असून, आलियाचा जन्म ब्रिटनमध्येच झाला आहे. त्यामुळे तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. कॅटरिना कैफबॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफ हिलादेखील मतदानाचा हक्क बजावता येत नाही. आज कॅटरिना भलेही भारतात राहत असली तरी तिचा जन्म हाँगकॉँग येथे झाला आहे. त्यामुळे तिने अद्यापपर्यंत भारतात मतदानाचा हक्क बजावलेला नाही. इमरान खानतुम्हाला हे वाचून सर्वांत जास्त आश्चर्य वाटेल की, आमिर खानचा भाचा इमरान खान जन्मताच अमेरिकन नागरिक आहे. इमरानने बॉलिवूडमध्ये ‘जाने तू या जाने ना’ आणि ‘आय हेट लव्हस्टोरी’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलेले आहे. मात्र अशातही त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. जेव्हा त्याला याविषयी विचारण्यात आले होते, तेव्हा त्याने म्हटले होते की, माझे दुर्भाग्य आहे की, भारतात दुहेरी नागरिकत्वाचा नियम नाही. जर मी माझा यूडी पासपोर्ट जमा केला तर मला पुढील दहा वर्षांचा अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागेल. यावर मी उपाय शोधण्याचे काम करीत आहे.नर्गिस फाखरीअभिनेत्री नर्गिस फाखरी हिचे वडील पाकिस्तानी नागरिक आहेत, तर आई युरोप खंडातील झेक या देशाची नागरिक आहे. त्यामुळे नर्गिसकडे भारताचे नागरिकत्व नसून पाकिस्तान आणि झेकचे दुहेरी नागरिकत्व आहे.जॅकलीन फर्नांडिस बॉलिवूडमध्ये जम बसवत असलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही मूळची श्रीलंका येथील आहे. तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नसल्याने ती मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. मात्र काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, जॅकलीन भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.सनी लिओनीपॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास केलेल्या भारतीय वंशाच्या सनी लिओनी हिलादेखील मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. सनीचे खरे नाव करणजित कौर वोहरा असे आहे. ती पंजाबी असून, तिच्या आई-वडिलांकडे भारतीय नागरिकत्व आहे. मात्र पॉर्नस्टार होण्यासाठी तिने कित्येक वर्षे कॅनडा येथे वास्तव्य केल्याने तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. २००६ मध्ये सनीने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले होते. त्यामुळे तिला भारतातील मतदान प्रक्रियेत सहभागी होता येत नाही.