Join us

मराठीत झळकलेले बॉलिवूड स्टार

By admin | Updated: June 10, 2016 00:00 IST

ऋषीता भट - मणीमंगळसूत्र या चित्रपटात ऋषीताने मुख्य भूमिका केली.सागरिका घाटगे - सतीश राजवाडे दिग्दर्शित प्रेमाची गोष्ट चित्रपटात ...

ऋषीता भट - मणीमंगळसूत्र या चित्रपटात ऋषीताने मुख्य भूमिका केली.

सागरिका घाटगे - सतीश राजवाडे दिग्दर्शित प्रेमाची गोष्ट चित्रपटात अतुल कुलकर्णीसोबत सागरिकाचा फ्रेश चेहरा झळकला.

अनिल कपूर - लक्ष्मीकांत बेर्डे वर्षा उसगावकरच्या हमाल दे धमालमध्ये अनिल कपूरनेही पाहुण्या कलाकाराची भूमिका केली.

हुमा कुरेशी - गुणी अभिनेत्री हुमा कुरेशीने नुकत्याच आलेल्या "हायवे" चित्रपटात काम केले. त्यामध्ये तारे जमीन पे फेम अभिनेत्री टिस्का चोप्राही होती.

जॅकी श्रॉफ - अभिनेत्री रेणुका शहाणेने "रिटा" चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. यामध्ये जॅकी श्रॉफने पल्लवी जोशीसह महत्वाची भूमिका केली.

रोहित शेट्टी - गोलमाल चेन्नई एक्स्प्रेस यासारख्या हिट चित्रपटांचा दिग्दर्शक असलेल्या रोहित शेट्टीने "पोस्टर बॉईज" या मराठी चित्रपटात छोटीशी भूमिका केली.

तनुजा - अनेक मराठी चित्रपटात झळकलेल्या तनुजा यांनी नुकतीच अभिनेता नितीश भारद्वाज दिग्दर्शित "पितृऋण" या चित्रपटात प्रमुख भूमिका केली.

सलमान खान - रितेश देशमुखच्या "लय भारी" चित्रपटात सलमानने कॅमिओ रोल केला होता.

उर्मिला मातोंडकर - बॉलिवूडमधील रंगीला गर्ल उर्मिलाने "शाळा"फेम सुजय डहाकेच्या " आजोबा" या मराठी चित्रपटात काम केले होते.

चित्रपटसृष्टीतील "फर्स्ट डान्सिंग स्टार" असलेले भगवानदादा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या "एक अलबेला" चित्रपटात "अभिनेत्री गीता बालीची भूमिका साकारात बॉलिवूड स्टार विद्या बालन मराठीत पदार्पण करत आहे. विद्याप्रमाणेच यापूर्वी अनेक बॉलिवूड स्टार्सनी मराठीत काम केले आहे...