Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडने असे साजरे केले रक्षाबंधन! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 16:08 IST

प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर, श्वेता बच्चन अशा अनेक अभिनेत्रींनी आपल्या भावाला राखी बांधली. या क्षणांचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधनाचा सण देशभर उत्साहात साजरा होतोय. बॉलिवूडही यात मागे नाही. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही उत्साहात हा सण साजरा केला. प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर, श्वेता बच्चन अशा अनेक अभिनेत्रींनी आपल्या भावाला राखी बांधली. या क्षणांचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.प्रियांका चोप्राने आज रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडून मिळालेल्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. माझ्याकडे भावांची फौज आहे. हा भावाच्या फौजेचा लीडर आहे. रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याबदल्यात त्याच्याकडून सुरक्षेचे वचन घेणारा हा सण माझा सर्वाधिक आवडता सण आहे, असे तिने लिहिलेय.

श्रद्धा कपूरने आपल्या ब्रदर्स गँगसोबतचा एक अनोखा फोटो शेअर केला आहे. यात सगळ्यांनी एकसारखे टी-शर्ट परिधान केले आहे.
श्वेता बच्चन हिनेही अभिषेकला राखी बांधतानाचा फोटो पोस्ट केला आहे. अभिषेकने हा फोटो आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे.

रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर हिनेही आपल्या सर्व भावंडासोबतचा एक सुरेख फोटो शेअर करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बिपाशा बासूने या मुहूर्तावर डिझाईनर रॉकी एससोबतचा फोटो शेअर केला आहे. याअर्थाने रॉकी एस बिपाशाचा मानलेला भाऊ आहे, हे स्पष्टचं आहे.

दिग्दर्शक जोया अख्तरने भाऊ फरहान अख्तरसोबतचा एक बालपणीचा फोटो पोस्ट करत, बेबी ब्रो, मेरे फेवरेट बॉय, असे लिहिले आहे.

सनी देओल यानेही राख्यांनी सजलेल्या मनगटाचा फोटो शेअर करत आपल्या सर्व बहिणींना राखीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विंकल खन्नाने राखीच्या मुहूर्तावर तिच्या एका लेखातील एक लाईन पोस्ट केली आहे़ बहिणींना भावांकडून सुरक्षा नको तर पाठींबा हवा, असे तिने लिहिले आहे.

टॅग्स :रक्षाबंधन