Join us  

'खिशात अवघे ३७ रुपये घेऊन या शहरात आलो...' ४० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीवर व्यक्त झाले अनुपम खेर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 4:14 PM

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचं नाव जगभरातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानावर येतं.

Anupam Kher : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचं नाव जगभरातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानावर येतं. आपल्या अष्टपैलु अभिनयानं त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत.  'कर्मा', 'तेजाब', 'राम लखन', 'दिल', 'सौदागर', '१९४२ ए लव स्टोरी', 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'हम आपके हैं कौन' यांसारखे दर्जेदार चित्रपट त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला दिले. गेल्या १६ फेब्रुवारीला त्यांचा 'कुछ खट्टा हो जाए' हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. 

अनुपम खेर यांनी हिंदी चित्रपट 'कुछ खट्टा हो जाये'चा ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी अनुपम यांनी अभिनेता म्हणून ४० वर्षांच्या सिनेसृ्ष्टीतील प्रवासाच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, 'आपल्या मार्गात जर अडथळे नसतील तर तो एक प्रवास होता असे म्हणता येणार नाही.  माझ्यावर फेकलेल्या दगडांनी मी एक माझा महल बांधला अशी एक म्हण आहे. तर आपल्या आयुष्यात अडचणी आल्या पाहिजेत, चढ-उतार आले पाहिजेत तरच आयुष्य जगता येईल आणि त्याचा आनंद घेता येईल. माझ्या पुढचा रस्ता साधा आणि गुळगुळीत असेल तर तेवढी मजा येणार नाही'.

पुढे ते म्हणाले, 'मी कायम माझ्या समोर उभ्या ठाकणाऱ्या संकटाचं स्वागत करतो.  मी खूप नशीबवान आहे, १९८१ मध्ये  खिशात केवळ ३७ रुपये घेऊन ते मुंबईमध्ये आलो होते आणि पाहा आज मी आपण माझ्या ५४० व्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. देवाकडे मी  आणखी काय मागू शकतो? त्यामुळे मी खूप आनंदी आहे'. मीडिया रिपोर्टनुसार, अनुपम हे ४०० कोटींच्या संपत्तींचे मालक असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, आता लवकरच त्यांचा 'कागज २' (Kaagaz 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :अनुपम खेरसेलिब्रिटी