Join us

बिझी आहे आयुष्मान

By admin | Updated: June 30, 2014 22:19 IST

आयुष्मान खुराणाचा ‘बेवकुफियाँ’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळवू शकला नाही, असे असतानाही सध्या आयुष्मानकडे चित्रपटांची कमतरता नाही.

आयुष्मान खुराणाचा ‘बेवकुफियाँ’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळवू शकला नाही, असे असतानाही सध्या आयुष्मानकडे चित्रपटांची कमतरता नाही. काही दिवसांपूर्वीच त्याने ‘हवाईजादा’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता तो फुटबॉलवर आधारित असलेल्या ‘1911’ या चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे. या चित्रपटासाठी तो फुटबॉल शिकणार आहे. याबाबत आयुष्मान सांगतो, ‘चित्रपट एका ख:या घटनेवर आधारित आहे. शुजीत सरकारने खूपच चांगली स्क्रिप्ट तयार केली आहे. या स्क्रिप्टच्या रूपात जॉन अब्राहमला त्याच्या पहिल्या अॅनिवर्सरीचे गिफ्ट द्यायची शुजीतची इच्छा आहे.’ हा चित्रपट ‘लगान’ आणि ‘चक् दे इंडिया’सारखाच असेल. ‘हवाईजादा’ हा चित्रपट वेगळ्या प्रकारचा असल्याचे त्याने सांगितले. यात तो एका मराठी तरुणाच्या भूमिकेत आहे, जो एक सायंटिस्ट असतो. यासाठी तो मराठी शिकला आहे.