Join us  

बिपाशाने उलगडले रहस्य

By admin | Published: October 05, 2016 2:49 AM

बिपाशा बासू ही तिच्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सतर्क आहे. फिट असणाऱ्या अभिनेत्री नेहमीच डाटए फूड खात असतील. काहीही खाताना त्या शंभर वेळा विचार करत असतील

बिपाशा बासू ही तिच्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सतर्क आहे. फिट असणाऱ्या अभिनेत्री नेहमीच डाटए फूड खात असतील. काहीही खाताना त्या शंभर वेळा विचार करत असतील, असे आपल्याला अनेक वेळा वाटत असते, तसेच डाएट फूड असले की, ते फूड टेस्टी नसणार असेच आपले मत असते, पण डाएट फूडही टेस्टी असते, असे बिपाशाचे म्हणणे आहे. बिपाशाने नुकतीच मास्टरशेफच्या सेटला भेट दिली होती. या भेटीत तिने या कार्यक्रमाचे स्पर्धक आणि परीक्षकांना डाएट फूड कशाप्रकारे टेस्टी बनवता येते, याविषयी सांगितले. तिच्या या पाककृती सगळ्यांनाच खूप आवडल्या. मास्टरशेफ म्हटले की, या कार्यक्रमात केवळ जेवण बनवणे ही एकच गोष्ट पाहायला मिळते, पण बिपाशामुळे या कार्यक्रमाला एक ग्लॅमर मिळाले. या सगळ्या स्पर्धकांना आपल्या आवडत्या अभिनेत्रीला भेटून खूप आनंद झाला. तिच्याकडून त्यांना अनेक गोष्टी जाणून घेता आल्या. काहींनी आपल्या डाएट फूडच्या पाककृतीही तिच्यासोबत शेअर केल्या.