Join us  

Bipasha Basuने लेक देवीला दिलं क्युट निकनेम, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 6:55 PM

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बिपाशा तिच्या मुलीसोबत क्यूट पोज देताना दिसत आहे.

अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर सध्या त्यांची मुलगी देवी हिच्यासोबत वेळ घालवताना दिसतात. बिपाशाने 12 नोव्हेंबर 2022 रोजी मुलगी देवीला जन्म दिला. देवीच्या जन्मानंतर काही दिवसानंतर तिने सोशल मीडियावर आपल्या देवीचा चेहराही दाखवला. आता अलीकडेच एका पोस्टद्वारे बिपाशाने  मुलीचं निकनेम  उघड केले आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 या व्हिडिओमध्ये बिपाशा तिच्या मुलीसोबत क्यूट पोज देताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्री म्हणाली, "देवीचं निकनेम मिष्टी आहे. तिच्या सर्वात लाडक्या मुमू माँने तिला हे नाव दिले. मिष्टी हे नाव देवीला तिची आजी ममता बासू यांनी दिले आहे. मिष्टीचा अर्थ 'गोड' असा होतो.

बिपाशा बसूच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली, "ओ मिष्टी देवी, किती सुंदर नाव आहे." तर दुसर्‍या लिहिले, "हे माझ्या आवडत्या नावांपैकी एक आहे."  अलीकडेच वडील करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा यांनी मुलगी देवीसाठी Audi Qute 7 कार खरेदी केली होती, ज्याची किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे.

2016 मध्ये बिपाशा व करण यांनी लग्नगाठ बांधली होती. अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 

टॅग्स :बिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हर