Join us  

हम आपके है कौन! भाईजानने फ्लर्ट करताच लाजली माधुरी, 'डोला रे डोला रे' वर केला डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 10:47 PM

माधुरी आणि सलमान खानचा सुपरहिट सिनेमा 'हम आपके है कौन' मधील एक सीन दोघांनी रिक्रिएट केला.

Bigg Boss 17 Finale: 'बिग बॉस'17 ग्रँड फिनालेमध्ये अजय देवगण आणि आर माधवन यांच्या एन्ट्रीने मजा आली. दोघांनी टॉप 5 स्पर्धकांमधून एकाला बाहेर काढलं. अरुण शेट्टी बाहेर पडल्यानंतर बिग बॉसला टॉप 4 स्पर्धक मिळाले. सध्या आता अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा आणि अभिषेक कुमार यांच्यामध्ये चुरस आहे. दरम्यान बिग बॉसच्या स्टेजवर धकधक गर्ल माधुरी दीक्षितने एन्ट्री घेतली.माधुरीसोबत सुनील शेट्टी म्हणजे बॉलिवूडचे अण्णाही आले. सलमान, माधुरी (Madhuri Dixit) आणि सुनील शेट्टीने (Suniel Shetty) फिनालेमध्ये रंगत आणली.

माधुरी आणि सलमान खानचा सुपरहिट सिनेमा 'हम आपके है कौन' मधील एक सीन दोघांनी रिक्रिएट केला. ट्विटरवर याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. माधुरीने यावेळी नेव्ही ब्लू रंगाचा ड्रेस घातला होता ज्यात तिचं सौंदर्य खुललं. माधुरीच्या एन्ट्रीवर सलमान खानने खास गाणं गात तिचं स्वागत केलं. शिवाय तिच्याशी फ्लर्टही केलं. माधुरीसाठी मुनव्वर फारुकीने एक शेर ऐकवला. तिच्या येण्याने बिग बॉसमधील प्रेक्षकही भारावले. 

शेवटी माधुरी, सुनील शेट्टी आणि सलमान खानने 'डोला रे डोला रे' वर डान्सही केला. माधुरी आणि सुनील शेट्टी कलर्सवर लवकरच सुरु होणाऱ्या 'डान्स दिवाने' मध्ये परिक्षक म्हणून सहभागी होणार आहेत. याच्याच प्रमोशनसाठी माधुरी आणि सुनील शेट्टीने हजेरी लावली.

टॅग्स :माधुरी दिक्षितसलमान खानसुनील शेट्टी