Join us  

बिग बॉस१४' स्पर्धक अर्शी खानला लागली लॉटरी, थेट बॉलिवूड सिनेमात काम करण्याची मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 2:24 PM

बिग बॉसमुळे अर्शी खानला बरीच लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळेच शोमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला होता. बिग बॉस शो नंतर प्रकाशझोतात आलेल्या अर्शी खानला मोठे प्रोजेक्ट मिळत नसले तरीही अनेक फॅशन ब्रँडसाठी रॅम्पवॉक आणि फोटोशूटच्या ऑफर तिला मिळत होत्या

कुणाचंही नशीब क्षणात पालटू शकतं हे झगमगत्या दुनियेत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण बिग बॉस १४ ची स्पर्धक अर्शी खानला थेट बॉलिवूड सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे.

बिग बॉस मुळेच अर्शिला एक वेगळी ओळख मिळाली. अर्शिने तिचा पहिल्या सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे.

तसेच शो मधून बाहेर पडल्यानंतर अर्शीने मुंबई स्वतःचं घर ही खरेदी केले आहे. नुकतीच नव्या घराची ही झलक तिने दाखवली होती.घर खरेदी केल्यानंतर तिने सलमान खांचेही विशेष अबहर मानले होते.

अर्शी खानने बिग बॉसच्या 11 व्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. या सिझननंतर पुन्हा एकदा या सिझनमध्ये अर्शीला बिग बॉसच्या घरात एंट्री मिळाली होती. बिग बॉसमुळे अर्शी खानला बरीच लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळेच शोमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला होता. बिग बॉस शो नंतर प्रकाशझोतात आलेल्या अर्शी खानला मोठे प्रोजेक्ट मिळत नसले तरीही अनेक फॅशन ब्रँडसाठी रॅम्पवॉक आणि फोटोशूटच्या ऑफर तिला मिळत होत्या.

सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. याआधीहीअर्शीचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.

टॅग्स :अर्शी खानबिग बॉस १४