ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - भांडणं, वादावादी, प्रेमप्रकरणं, विविध टास्क्स आणि सलमानचे खुसखुशीत सूत्रसंचालन यामुळे 'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो नेहमीच चर्चेत असतो. या शोचे सध्या १०वे पर्व असून यावेळी सेलिब्रिटींसोबत आपल्याला सामान्य लोकही पहायला मिळत आहेत. गेल्या महिन्यात सुरू झालेल्या या शोला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून नेहमीप्रमाणेच शोमध्ये रुसवे-फुगवे, हेवदावे, भांडण , गॉसिप, अशी फुल ऑन धम्माल सुरू आहे. या शोमधील सौंदर्यवती मॉडेल लोपमुद्रा राऊत हिची बरीच चर्चा सुरू आहे. नागपूरच्या कन्येने दक्षिण अमेरिकतील इक्वाडोर येथे आयोजित ‘मिस युनायटेड कॉन्टिनन्ट २०१६' स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
सध्या ती बिग बॉसच्या १० व्या पर्वात असून तिची फिगर, बिकीनी याबद्दल चर्चेत होती. मात्र सौंदर्यासोबत ती तिच्या बुद्धीचाही चांगला वापर करते. बिग बॉसच्या घरात राहताना ती नेहमीच योग्य मुद्दे मांडत ठामपणे उभी राहते.
नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात चाहत्यांना तिचा नवा अंदाज पहायला मिळाला. मॉडेल लोपामुद्रा चक्क एक स्टायलिस्ट बनली होती. शोमध्ये सामान्य नागरिकांच्या टीममधील स्पर्धक नवीन प्रकाश याचा मेकओव्हर करताना दिसली. लोपामुद्राने त्याचा हेअरकट करत त्याला एक नवा लूक बहाल केला. तिच्या या स्कीलमुळे नवीन प्रकाशही खूप खुश असून त्याला त्याचा हा मेकओव्हर खूपच आवडला आणि इतरांनीही तिची प्रशंसा केली.