अनिल कपूरचा लहान भाऊ संजय कपूर हा नुकताच शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांच्या चित्रपटात व्हिलनच्या रोलमध्ये दिसला. बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट आदळला गेला, म्हणून संजयला कोणीही विचारले नाही. संजय हे समजत होता की, या चित्रपटाबरोबर बॉलीवूडमध्ये आपण जोरदार पुन: प्रवेश करीत आहोत. मात्र या अपयशाला तो आपल्या नशिबाला दोष देऊ शकतो. संजयच्या करिअरच्या बाबतीत विचार केला तर त्याचे मोजकेच चित्रपट यशस्वी ठरले आहेत. मात्र त्याच्या नशिबाचे एक सत्य असे जोडले गेले आहे की बॉक्स आॅफिसवर तो शाहरूख खानच्याही पुढे गेला होता. ही गोष्ट खरंच आश्चर्यचकित करणारी असली तरी सत्य आहे. २००१ मध्ये शाहरू ख खान व जुही चावला यांचा ‘वन टू का फोर’ प्रदर्शित झाला होता. त्या वेळी शाहरूखचे नशीब जोरात होते. त्यामुळे या चित्रपटाच्या यशाबद्दल जरा जास्तच अपेक्षा होत्या. या चित्रपटासोबतच अजून एक चित्रपट ‘छुपा रुस्तम’ प्रदर्शित झाला होता. त्यात संजय कपूर व मनीषा कोईराला प्रमुख भूमिकेत होते. संजय कपूरच्या नावामुळे हा चित्रपट चालेल की नाही याबाबत शंका होती. ३० मार्च २००१ ला दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तमाम गैरसमजाला दूर करून शाहरूख खानचा चित्रपट पहिल्याच आठवड्यात कोसळला, तर सर्वांना आश्चर्यात टाकत संजयच्या चित्रपटाने दिल्ली, पंजाब, बिहार आणि उत्तर प्रदेशात मोठा व्यापार केला. बिहारमध्ये तर या चित्रपटाच्या यशाने खूप जुने रेकॉर्ड तोडले. या यशाने लोक आश्चर्यचकित झाले. संजय क पूर स्वत: सुन्न झाला. शाहरूख खानच्या चित्रपटाला मागे टाकण्याच्या गोष्टी मीडियाला सांगून आनंद व्यक्त करत होता. लहान बजेटच्या चित्रपटाने मोठ्या बजेटच्या चित्रपटाला असे मागे टाकण्याचा हा पहिला आणि एकच अनुभव नाही. बॉलीवूडच्या इतिहासात असा किस्सा अजून सांगता येईल. राहुल रावल दिग्दर्शित सनी देओलचा ‘डकैत’ व राजश्री प्रोडक्शनचा ‘प्रतिघात’ यांचे उदाहरण देता येईल. अजय देवगनसोबत असे दोन वेळा घडले. ‘फुल और कांटे’ विरुद्ध ‘लम्हे’ व ‘जिगर’ विरुद्ध ‘यलगार’ अजयसमोर दोन्ही मोठ्या फिल्मस चालल्या नाहीत.
बिग बजेटवर लहान सिनेमांची सरशी...
By admin | Updated: November 22, 2015 03:19 IST