अमिताभ बच्चन आणि आमिर खान या दोघांच्या चाहत्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत जे कधी बॉलिवूडमध्ये घडले नाही, ते होण्याची शक्यता आहे. लवकरच एका चित्रपटात हे दोन मोठे कलाकार एकाच चित्रपटात काम करणार असल्याचे समजते. सलमान आणि शाहरुख यांनी अमिताभसोबत काम केले आहे. मात्र आमिरने त्यांच्यासोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ असेल. अमिताभ आणि आमिर हे विजय कृष्ण आचार्य यांच्या चित्रपटात एकत्र काम करणार असून या चित्रपटाची निर्मिती यशराज बॅनर करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन्ही प्रसिद्ध कलाकारांनी चित्रपटासाठी निर्मात्यांना होकार कळवल्याचे कळते. या चित्रपटाची अधिकृत घोषणा होईपर्यंत यासंबंधीची सर्व माहिती गुप्त ठेवण्याचे आदेश निर्मात्यांनी सर्व कलाकारांना दिले आहेत. गेली अनेक दशके अमिताभ आणि आमिर हे बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत हे दोन्ही मोठे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र दिसले नाहीत. यशराज बॅनर अंतर्गत बनणारा हा चित्रपट एक अॅक्शनपट असणार आहे. फिलीप मिडॉस टेलर यांनी १८३९ साली लिहलेल्या ‘कन्फेशन्स आॅफ अ ठग’ या पुस्तकावर आधारित आहे. या पुस्तकातील कथा पैशासाठी आणि महागड्या वस्तूंसाठी प्रवाशांची केली जाणारी हत्या यावर आधारित आहे.
बिग बी, आमीर एकाच चित्रपटात?
By admin | Updated: August 15, 2016 03:31 IST