Join us

भरत जाधव झाला 'चिरंजीव'

By admin | Updated: January 1, 2016 03:25 IST

अभिनेता भरत जाधवचे नाव घेतल्यावर त्याच्या विनोदी भूमिका प्रथम डोळ्यांसमोर तरळतात. विनोदाचा हुकमी एक्का म्हणून भरतने त्याची ओळख ठसवली असतानाच, त्याला छेद देण्याचा

अभिनेता भरत जाधवचे नाव घेतल्यावर त्याच्या विनोदी भूमिका प्रथम डोळ्यांसमोर तरळतात. विनोदाचा हुकमी एक्का म्हणून भरतने त्याची ओळख ठसवली असतानाच, त्याला छेद देण्याचा प्रयत्न आता त्याने केला आहे. 'चिरंजीव' या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेला विनोदाचा अजिबात स्पर्श झालेला नाही. कोकणातल्या रूढी, परंपरांवर आधारित या चित्रपटात, आतापर्यंत त्याने रंगवलेल्या भूमिकांपेक्षा हटके अशी व्यक्तिरेखा साकारली आहे. १५ जानेवारी रोजी पडद्यावर येणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश मोरे यांनी केले असून, या चित्रपटाद्वारे मल्याळम भाषिक निर्माते रामदास नायर प्रथमच मराठी चित्रपट निर्मितीत उतरले आहेत.