Join us

बेस्ट फ्रेंड ते नवरा-बायको

By admin | Updated: August 2, 2015 05:05 IST

मी उमेशला खूप लहानपणापासून ओळखते. तेव्हा मी १०वीमध्ये होते; पण तेव्हा आम्ही कधीच एकमेकांशी बोललो नव्हतो. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा बोललो ते ‘आभाळमाया’ मालिकेच्या

- प्रिया बापट, अभिनेत्री

मी उमेशला खूप लहानपणापासून ओळखते. तेव्हा मी १०वीमध्ये होते; पण तेव्हा आम्ही कधीच एकमेकांशी बोललो नव्हतो. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा बोललो ते ‘आभाळमाया’ मालिकेच्या शेवटच्या एपिसोडला. अगदी कॉलेजमध्येही मी माझ्या एका बेस्ट फ्रेंडद्वारे एकमेकांशी बोलायचो; पण त्यानंतर आम्हीच एकमेकांचे बेस्ट फ्रेंड झालो आणि मैत्रीचे रूपांतर आता लग्नात झाले आहे. पण तरी आजही आमच्यात नवरा-बायकोचे नाते नाही. आम्ही खूप छान फ्रेंड्स आहोत. त्यामुळे नातेही एकदम फ्रेश राहते. एकदा आम्ही रिलेशनशिपमध्ये नसतानाचा किस्सा आहे. मी उमेशची पहिल्यापासूनच फॅन होते आणि त्याचे मित्र दादरला राहायचे म्हणून तो त्यांना भेटायला बऱ्याचदा तिकडे यायचा. असाच एकदा तो दादरला आला होता आणि हे मला माहीत नव्हते; पण माझ्या एका मैत्रिणीने त्याला पाहिले आणि मला सांगितले. आणि या मुद्द्यावरून मी त्याच्याशी प्रचंड भांडले होते, की तू माझ्या घराखालून गेलास आणि मला का भेटला नाहीस? असे भांडण म्हटले तर आम्ही रिलेशनशिपमध्ये असताना खूप भांडायचो; पण आमच्यातील भांडण आणि अबोला एक दिवसापेक्षा जास्त कधीच टिकला नाही.