Join us  

"सुंदर असणं म्हणजे...", अश्विनी महांगडेनं सांगितली सौंदर्याची खरी व्याख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 7:49 PM

Ashwini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे हिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. यात तिने सौंदर्यांची व्याख्या सांगितली आहे.

सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत काम करताना दिसते आहे. यात ती अनघाची भूमिका साकारते आहे. या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. सध्या तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. यात तिने सौंदर्यांची व्याख्या सांगितली आहे.

अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे, ज्यात अफव्हाइट रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, सुंदर असणं म्हणजे आहे तसं खरं वागणं, कारण तुम्हाला लोकांनी नाही तर स्वतःच स्वतःला स्वीकारण्याची गरज आहे. #मनातलं_काही

 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया अश्विनीच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका युजरने लिहिले की, म्हणजेचं...सुंदर असणं म्हणजे तुमच्या सारखं असणं. दुसऱ्या युजरने म्हटले की, ताई तू खूप खूप सुंदर आहेस. अशीच राहा कायम. काहींनी सो क्युट, सुंदर अशा कमेंट्स केल्या आहेत. 

वर्कफ्रंट... अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. तिने टपाल, बॉईज, महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत काम करताना पाहायला मिळते. तसेच ती धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर या चित्रपटात झळकणार आहे. 

टॅग्स :अश्विनी महांगडे