Join us

४0 च्या दशकाची सुंदरी सोनाक्षी

By admin | Updated: May 29, 2014 15:14 IST

सोनाक्षी सिन्हा ही रुपेरी पडद्यावर ४0 च्या दशकातील सुंदरीची भूमिका साकारणार आहे.

सोनाक्षी सिन्हा ही रुपेरी पडद्यावर ४0 च्या दशकातील सुंदरीची भूमिका साकारणार आहे. दक्षिण भारतीय चित्रपटातील प्रसिद्ध दिग्दर्शक एस. रवीकुमार रजनीकांतसह एका चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या माध्यमातून सोनाक्षी तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे.  अनुष्का शेट्टीही यात काम करणार असून, रजनीकांत दुहेरी भूमिकेत आहे. ही भूमिका सोनाक्षीच चांगल्यारीत्या करू  शकते, असा निर्मात्यांचा दावा आहे. हिंदी आणि तमिळमध्ये एकाच दिवशी चित्रपट रिलीज होईल.