Join us

मॅडोनासारखे बनायचेय : प्रियंका

By admin | Updated: August 19, 2014 22:42 IST

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा तिच्या लहानपणापासूनच पॉप सिंगर मॅडोनाला स्वत:चे आदर्श मानते. प्रियंका सांगते की, तेव्हापासून तिला मॅडोनाचे व्यक्तिमत्त्व खूप आवडते.

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा तिच्या लहानपणापासूनच पॉप सिंगर मॅडोनाला स्वत:चे आदर्श मानते. प्रियंका सांगते की, तेव्हापासून तिला मॅडोनाचे व्यक्तिमत्त्व खूप आवडते. त्यामुळे तिला मॅडोनासारखे बनायचे आहे. नुकतेच 16 ऑगस्टला मॅडोनाने तिचा 56 वा वाढदिवस साजरा केला आहे. प्रियंकाने मायक्रोब्लॉगिंग साईट टि¦टरवर मॅडोनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रियंकाने टि¦टरवर लिहिले की, ‘लहानपणापासून माझी आदर्श असलेल्या मॅडोनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू ज्या खुलेपणाने आयुष्य जगतेस ते आवडते, अशा खूप आठवणी आहेत.’ मॅडोनाप्रमाणोच प्रियंकाही एक अभिनेत्री असून तिला मॅडोनासारखेच रॉकस्टार बनायचे आहे. मागील वर्षी प्रियंकाने तिचा एक आंतरराष्ट्रीय म्युजिक अल्बम लाँच केला होता.