Join us  

बाजीराव मस्तानी

By admin | Published: October 19, 2015 12:00 AM

दिवानी मस्तानी हे गाणं लवकरच रीलीज होणार असून दीपिकाच्या मते मुगले आझममधल्या प्यार किया तो डरना क्या या गाण्याच्या ...

दिवानी मस्तानी हे गाणं लवकरच रीलीज होणार असून दीपिकाच्या मते मुगले आझममधल्या प्यार किया तो डरना क्या या गाण्याच्या तोडीचं हे गाणं आहे.

प्रियांका चोप्राने बाजीराव पेशव्यांची पहिली पत्नी काशीबाईची भूमिका या चित्रपटात साकारली आहे.

रामलीलाच्या यशानंतर रणवीरसिंह व दीपिका या हिट जोडीसह पुन्हा बाजीराव मस्तानीचं आव्हान पेललंय संजय लीला भन्साळीनं

मस्तानी ही बुंदेलखंडच्या छत्रसालांची पर्शियन मुस्लीम पत्नीपासून झालेली मुलगी. छत्रसालांचं मुघलांपासून संरक्षण केल्यामुळे त्यांनी बाजीरावाला पुत्रवत मानलं आणि मस्तानीला भेट म्हणून दिलं.

बाजीरावाच्या मस्तानीला मुस्लीम म्हणून तत्कालिन कर्मठ ब्राह्मण समाजानं कधीच स्वीकारलं नाही. मात्र बाजीरीवानं तिच्यासाठी वेगळा महाल बांधला तसेच तिच्यापासून झालेल्या मुलाला उत्तरेतल्या बांद्याची जहागिरी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्य भारतभर पसरले ते थोरल्या बाजीरावाच्या काळात. होळकर शिंदे जाधव गायकवाड पवार असे अनेक सेनापती घडवत त्यांना वेगवेगळ्या प्रांतात बाजीरावाने जहागि-या दिल्या ज्यांचे वंशज आजही त्या त्या भागात आहेत.

बाजीराव मस्तानी हा माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात आव्हानात्मक चित्रपट आहे अशी प्रतिक्रिया दीपिकानं व्यक्त केलं.

दीपिका पदुकोणच्या मस्तानीची कॉस्च्युम्स अंजू मोदी यांनी तयार केली आहेत.

वीस वर्षांच्या पेशवेपदाच्या काळात ४१ लढाया लढणारा आणि एकही लढाई न हारणा-या पहिल्या बाजीरावाच्या मस्तानी या प्रकरणावर बेतलेला हा चित्रपट १८ डिसेंबर रोजी झळकणार आहे. रणवीरसिंह बाजीरावाची तर दीपिका पदुकोण मस्तानीची भूमिका साकारत आहे.