धूम 2 आठवतोय? या चित्रपटात हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांच्या लिपलॉक सीनमुळे बच्चन कुटुंबीय नाराज झाल्याची चर्चा होती. बच्चन कुटुंबाच्या सूनेकडून अशा सीनची त्यांना अपेक्षा नव्हती. अर्थात हा झाला भूतकाळ. पण ताज्या बातमीनुसार, बच्चन कुटुंब पुन्हा एकदा ऐश्वर्यावर नाराज आहे. होय, ऐश्वर्या लवकरच करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्याने रणबीर कपूरसोबत अनेक हॉट सीन दिल्याचे कळते. यामुळे बच्चन कुटुंब ऐश्वर्यावर नाराज असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चन कुटुंबाने याबाबतीत ऐश्वर्याला समज दिली आहे. बच्चन कुटुंबाच्या सुनेला असे सीन देणे शोभत नाही, असे तिला बजावण्यात आल्याचे समजते. खुद्द बिग बी अमिताभ बच्चन हे सुद्धा यामुळे नाराज आहेत. इतके की, त्यांनी स्वत: करणला ऐश्वर्याचे हे हॉट सीन हटवण्याची गळ घातली आहे. सूत्रांच्या मते, त्यांच्या या विनंतीनंतर करण हे हॉट सीन गाळण्यासाठी तयारही झाला. ऐश्वर्या व रणबीर यांच्यातील हॉट सीन चित्रीत करताना बरीच काळजी घेतली गेली होती. खरे तर ऐश्वर्या व रणबीर यांचा लिपलॉक सीन या चित्रपटाची गरज होती. मात्र ऐश्वर्याने रणबीरसोबत लिपलॉक सीन देण्यास नकार दिला. ऐश्वर्या रणबीरपेक्षा वयाने बरीच मोठी आहे. त्यामुळे तिने हा सीन देण्यास नकार दिला. याऊपरही बच्चन कुटुंब ऐश्वर्यावर नाराज असल्याचे कळते. आता ही नाराजी ऐश्वर्या कशी दूर करते, हे तिलाच ठाऊक!
ऐश्वर्याच्या हॉट सीनमुळे बच्चन कुटुंब पुन्हा नाराज??
By admin | Updated: July 31, 2016 02:12 IST