Join us  

माधुरी दीक्षितसोबत पडद्यावर रोमान्स, आमिर खानसोबत पंगा, आता कुठे आहे अयुब खान?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 3:36 PM

Where Is Film 'Salaami' Actor Ayub Khan Now- 1994 मध्ये आलेल्या 'सलमी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे अभिनेता अयुब खान आता चित्रपटांच्या दुनियेतून गायब झाले आहेत.

अयुब खान  (Ayub Khan) आज कोणत्याही परिचयाची गरज नाही आहे. चित्रपट आणि मालिकांचे प्रसिद्ध अभिनेते, अयुब खान यांनी 1994 मध्ये आलेल्या 'सलमी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंत हा अभिनेता खलनायक म्हणून ओळखला जातो, पण अयुब खान यांचा चित्रपट प्रवास नायक म्हणून सुरू झाला. 'सलामी'नंतर 'सलमा पर दिल आ गया' आणि 'मृत्युदंड' सारख्या चित्रपटांमध्ये ते हिरोच्या भूमिकेत दिसले, पण त्यांना चित्रपटांमधून फारशी ओळख मिळू शकली नाही.

मुख्य भूमिकेत यश न मिळाल्यानंतर या अभिनेत्याने साईड रोल करायला सुरुवात केली. अयुब खान 'मेला' आणि 'दिल चाहता है'सह अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये दिसले. पण या अभिनेत्याला खरी ओळख फक्त छोट्या पडद्यावरुनच मिळाली. कलर्स टीव्हीवरील 'उतरन' ही मालिका अयुब खान यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरली. या शोमध्ये सशक्त व्यक्तिरेखा साकारून वाहवा मिळवल्यानंतर, या अभिनेत्याकडे छोट्या पडद्यावर प्रोजेक्ट्सची लाईन लागली. 

अनेक वर्षे मिळालं नाही काम54 वर्षीय अभिनेता 'शक्ती: अस्तित्व के एहसास की', 'एक हसीना थी' आणि 'बदतमीज दिल' सारख्या लोकप्रिय शोमध्ये दिसला आहे. 2021 मध्ये अयुब खान पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले जेव्हा त्यांनी कोरोनाच्या काळात त्यांच्या आर्थिक संकटाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले होते की, दीड वर्षांपासून माझ्याकडे काम नाही. दीड वर्षांपासून मी पैसे कमावले नाहीत. बँक बॅलेन्स संपला आहे. पण मी काहीही करू शकत नाही. आता जे आहे, त्यातच दिवस काढावे लागतील. स्थिती आणखी बिघडली तर मला लोकांपुढे हात पसरावे लागतील. यापेक्षा दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक उरणार नाही.

बराच काळ पडद्यावरून गायब झाल्यानंतर गेल्या वर्षी अयुब खान 'जासूस बहू' आणि 'गुर से मीठा इश्क'मध्ये दिसले होते. या लोकप्रिय टीव्ही स्टारबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे की, ते बॉलिवूडचा 'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार यांचा भाचा आहेत.

आई-वडिलही कलाकारअयुब खानचे आई-वडीलही खूप प्रसिद्ध अभिनेते होते. त्याचे वडील नसीर खान यांनी 'नगीना' आणि 'यादों की बारात' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर अयुब खानची आई 'नील कमल', 'सोनी महिवाल' सारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या.

टॅग्स :सेलिब्रिटीदिलीप कुमार