Join us

अयानने शोधली रणबीरची नवी हिरोईन

By admin | Updated: July 16, 2014 13:18 IST

दीपिका पदुकोण आणि कॅटरिना कैफ यांच्यानंतर अयान मुखर्जीने रणबीर कपूरसाठी नवी हिरोईन शोधली आहे. ही नवी हिरोईन आलिया भट्ट असण्याची शक्यता आहे.

दीपिका पदुकोण आणि कॅटरिना कैफ यांच्यानंतर अयान मुखर्जीने रणबीर कपूरसाठी नवी हिरोईन शोधली आहे. ही नवी हिरोईन आलिया भट्ट असण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार अयान त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी आलियाला घेऊ इच्छितो. अयानचा जवळचा मित्र रणबीर यात मुख्य भूमिकेत असेल. चित्रपटाच्या कास्टिंगबाबत विचारण्यात आले, तेव्हा कलाकारांचा विषय टाळत त्याने अद्याप चित्रपटाची स्क्रिप्ट लिहीत असल्याचे सांगितले. फायनल स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर कलाकारांबाबत काही सांगता येईल, असे तो म्हणाला.