Join us  

सलमान खानच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का ? आता आहे लाईमलाइटपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 2:11 PM

वयाच्या चौथ्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरुवात केली.

बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया बऱ्याच कालावधीपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. आयशा टाकिया सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. 

वयाच्या चौथ्या वर्षी आयशाने मॉडेलिंग सुरु केले. वयाच्या १५ व्या वर्षी फाल्गुनी पाठकच्या ‘मेरी चूनर उड उड जाऐ’ या म्युझिक अल्बममध्ये ती झळकली. या अल्बममुळे आयशा अचानक प्रकाशझोतात आली होती.आयशाचे वडील गुजराती तर आई ब्रिटीश आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आली तेव्हा आयशाला हिंदीचा एकही शब्द बोलता येत नव्हता. पण अ‍ॅक्टिंग करिअरसाठी आयशा मोठ्या जिद्दीने हिंदी व तेलगू भाषा शिकली. 

आयशा टाकियाने बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या चित्रपटात काम केले आहे. तिने करियरची सुरूवात २००४ साली टारझन द वंडर कार चित्रपटातून केली. त्यानंतर ती बऱ्याच चित्रपटात झळकली. २००९ साली ती सलमान खानसोबत वॉण्टेंड चित्रपटात पहायला मिळाली. पुढे सलमान खानच्या 'वॉन्टेड' या चित्रपटाने आयशाला मोठी ओळख दिली.यानंतर दिल मांगे मोर, शादी नंबर १, कॅश, पाठशाला, दे ताली अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. पण तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही.  २००९ मध्ये फरहान आजमीसह लग्नबंधनात अडकत तिच्या आयुष्यात बिझी झाली.

आयशाचा शेवटचा चित्रपट मोड होता. हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत रणविजय सिंग मुख्य भूमिकेत होता.  

टॅग्स :आयशा टाकिया